33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home Top News 5 वाजेपर्यंत राज्यात 57 %, तर कोल्हापूरमध्ये सर्वाधिक 66 % मतदान

5 वाजेपर्यंत राज्यात 57 %, तर कोल्हापूरमध्ये सर्वाधिक 66 % मतदान

0
26

blank

मुंबई,दि.23ः- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला मंगळवारी सकाळपासून सुरुवात झाली. यात महाराष्ट्रातील औरंगाबाद, रायगड, पुणे, जळगाव, रावेर, माढा, सांगली, जालना, बारामती, अहमदनगर, सातारा, रत्नागिरी-सिंधूदुर्ग, हातकणंगले, कोल्हापूर इत्यादींचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये गुजरातमधील सर्व 26 जागा तर केरळ येथील सर्व 20 जागांवर मतदान झाले. यासोबत आसाममध्ये 4 जागा, बिहारमध्ये 5 जागा, छत्तीसगडमध्ये 7 जागा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात 14 जागा, ओडिशामध्ये 6 जागा, उत्तर प्रदेशात 10 जागा, पश्चिम बंगालमध्ये 5 जागा, गोव्यात 2 आणि दादर नगर हवेली, दमन दीव आणि त्रिपुरामध्ये प्रत्येकी 1-1 जागेवर मतदान झाले.

संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान तिसरा टप्प्यात या मतदारसंघात इतके टक्के मतदान झाले.

जळगाव – 52%,रावेर – 57 %,जालना – 60 %,औरंगाबाद – 59 %,रायगड – 56 %,पुणे – 44 %,बारामती – 56 %,अहमदनगर – 58 %,माढा – 56 %,सांगली – 59 %,सातारा – 55 %, रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 58 %,कोल्हापूर – 66 %,हातकणंगले – 65 % या सर्व आकडेवारीवरून महाराष्ट्रात सरासरी – 57 % टक्के मतदान झाल्याचे समोर आले आहे

blank