26.6 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home राजकीय जयदत्त क्षीरसागरांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश,‘शिवबंधन’ बांधले

जयदत्त क्षीरसागरांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश,‘शिवबंधन’ बांधले

0
31

मुंबई,दि.22ः- बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी आज बुधवारी शिवसेना भवनमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी जयदत्त क्षीरसागर यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षामध्ये स्वागत केले. यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, खासदार सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, संजय राऊत हे देखील उपस्थित होते.क्षीरसागर यांचे विरोधीपक्ष नेते धनजंय मुंडे यांच्यासोबत मतभेद निर्माण झाल्याने त्यांनी पक्ष सोडल्याचे बोलले जात आहे.त्यापुर्वी त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा दिला.

blank