निवडणूक निरिक्षकांच्या उपस्थितीत मतमोजणी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुसरे सरमिसळीकरण

0
11

भंडारा,दि. 22 :- 11-भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूकीची तयारी पुर्ण झाली असून आज निवडणूक निरिक्षक डॉ. पार्थ सारथी मिश्रा यांच्या उपस्थितीत मतमोजणी पर्यंवेक्षक व सहाय्यकांचे दुसरे सरमिसळीकरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी शांतनू गोयल, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले,उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रमोद भुसारी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, अभिमन्यु बोदवड, कार्यकारी अभियंता दिनेश नंदनवार, एनआयसी डिआयओ संदिप लोखंडे व अधिकारी उपस्थित होते.
मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय 14 टेबल असणार आहेत. यासाठी 96 पर्यवेक्षक,96 सहाय्यक व 102 सुक्ष्मनिरिक्षक नेमले आहेत. या अधिकाऱ्यांचे आज सरमिसळीकरण करण्यात आले. यानंतर निवडणूक निरिक्षकांनी मतमोजणीच्या व्यवस्थेचेी पाहणी केली. मॅन्युअल टॅबुलेशन व संगणकीय टॅबुलेशनची माहिती त्यांनी दिली. प्रत्येक विधानसभेचे मतमोजणी केंद्र, कम्युनिकेशन सेंटर, मिडीया सेंटर व टॅबुलेशन सेंटरची पाहणी केली. स्ट्राँग रुमला निवडणूक निरिक्षकांनी भेट दिली.
मतमोजणी केंद्रावर वैद्यकीय सुविधा, अग्नीशमन दल, पॉवर बॅकप, पुरेसे पाणी व सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याच्या सुचना डॉ. मिश्रा यांनी दिल्या. मतमोजणीचे वेळापत्रक ठरविण्यात यावे. सोबतच तांत्रिक चमु सज्ज ठेवावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. मतमोजणीची रंगीत तालीम 21 मे रोजी घेण्यात आली असून सर्व व्यवस्था सुरळीत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.