सालेकसा,दि.20ः- आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय पुराम यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सभागृहात आढावा सभा घेण्यात आली.या सभेत नागरिकांच्या समस्यांचे निराकारण करण्यात आले.तर काही तक्रारींच्या निराकरणासाठी वेळ देण्यात आला.बँकेकडून कर्ज मिळत नसल्याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.सभेला तहसीलदार सी.जी. पितुलवार, खंड विकास अधिकारी वाघाये, प.स. सभापती अर्चना उइके, नगरपंचायत अध्यक्ष वीरेंद्र उइके, जि.प. महिला व बालकल्याण सभापती लताबाई दोनोडे, उपसभापति दिलीप वाघमारे, मंडल अध्यक्ष परसराम फुडे, महामंत्री राजेन्द्र बड़ोले, माजी प,स, सभापती बाबा लिल्हारे, बाबूलाल उपराडे, देवराज वडगiये, प.स. सदस्या जया डोये, भरत लिल्हारे,तालुका कृषी अधिकारी, उपनिबंधक सहकारी संस्था,मुख्याधिकारी नगरपंचायत, पोलिस निरीक्षक, उपअभियंता जि.प.ल.पा., उपअभियंता सार्वजनिक बांधकाम, उपअभियंता बाघ पाटबंiधरे, उपअभियंता जल संधारण, तालुका वैद्यकीय अधिकारी, दुय्यम निबंधक, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तालुका निरीक्षक भूमी अभिलेख, पशु वैद्यकिय अधिकारी,गट शिक्षणाधिकारी, बँक व्यवस्थापक, इत्यादी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.आढावा सभेचे संचालन सुरेन्द्रकुमार खोब्रागडे विषयतज्ञ पं स.सालेकसा तर आभार नंदा पारवे पर्यवेक्षीका यांनी मानले.





