31.3 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home शैक्षणिक मॉडेल कॉन्व्हेंटमध्ये शिक्षक प्रशिक्षणाचे आयोजन

मॉडेल कॉन्व्हेंटमध्ये शिक्षक प्रशिक्षणाचे आयोजन

0
55

गोरेगाव,दि.02ः-स्थानीय मॉडेल कॉन्व्हेंट एण्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक प्रशिक्षणाचे आयोजन रविवारला करण्यात आले होते. संस्थापक अध्यक्ष आर.डी.कटरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले. या प्रशिक्षणात विध्यार्थी शिक्षक आंतरक्रिया, आनंददायी शिक्षण प्रणाली, वर्गामध्ये इंग्रजीचे वापर करणे अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करून विद्यार्थ्याना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देऊन त्यांची गुणवत्ता कशाप्रकारे वाढविता येईल यावर प्रशिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. त्याच प्रकारे पाठावर आधारित प्रश्न तयार करून प्रश्नपेढी तयार करण्यावर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निरंतर मॉडेल कॉन्व्हेंटचे संस्थापक आर. डी. कटरे यांच्या कडून अशा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येते.जेणेकरून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करता येईल. या प्रशिक्षणाला शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता पद्माकर महाजन यांनी आभार मानून केली.