अर्जुनी मोर,दि.२६ :-भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनिल मेंढे हे तालुक्याच्या दौèयावर आले असता त्यांनी झरपडा ग्रामपंचायतीला भेट देऊन विविध विषयावर चर्चा केली.खासदार मेंढे यांच्या उपस्थितीतच ग्रामसभेचे आयोजन करुन अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. गावातील ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले.सोबतच तंटामुक्त समिती अध्यक्षपदी भैयालाल मेश्राम यांची पुन्हा निवड करण्यात आली.सरपंच कुंदा डोंगरवार,सामाजिक कार्यकर्ते गजानन डोंगरवार यांच्या हस्ते खासदार मेंढे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी ग्रामसेवक साखरे,ग्रामपंचायत सदस्य ,अंगणवाडी सेविका मंगला लांडेकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभेचे संचालन व आभार कुंदा डोंगरवार यांनी केले.सभेच्या यशस्वीतेसाठी परिचर विठ्ठल शाहारे,सी दहिवले यांनी सहकार्य केले





