26.9 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ समाधान शिबीर पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

समाधान शिबीर पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

0
23
  • ३ सप्टेंबर रोजी शिबिराचे आयोजन

वाशिमदि. २६ :  सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान अंतर्गत पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित समाधान शिबिराच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. ३ सप्टेंबर २०१९ रोजी होणाऱ्या या समाधान शिबिराच्या अनुषंगाने दाखल झालेल्या तक्रारींवर शासकीय यंत्रणांनी केलेल्या कार्यवाहीचा यावेळी आढावा घेण्यात आला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, महसूलचे उपजिल्हाधिकारी रमेश काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे, प्रकाश राऊत, अनुप खांडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, सुदाम इस्कापे, श्री. तापी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांच्यासह सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी व विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, समाधान शिबिराच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या तक्रारींवर संबंधित विभागांनी तत्काळ कार्यवाही करावी. शिबिराच्या तारखेत बदल होवून हे शिबीर ३ सप्टेंबर रोजी होणार असल्याने या तक्रारी निकाली काढण्यासाठी अधिकचा वेळ मिळाला आहे. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा प्रमुखांनी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाच्या तालुका व जिल्हास्तरीय कार्यालयांकडे प्राप्त झालेल्या तक्रारींची सद्यस्थीती तपासून त्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच तहसीलदार यांनी सुद्धा त्यांच्या स्तरावर सर्व संबंधित यंत्रणांची सभा घेऊन तक्रारींच्या अनुषंगाने झालेल्या कार्यवाहीचा आढावा घ्यावा. प्रत्येक तक्रारीचे उत्तर हे मुद्देसूद व सुस्पष्ट स्वरुपात द्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

blank