26.9 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ माजी प्रधानमंत्री, भारतरत्न राजीव गांधी यांची ७५ वी जयंती साजरी

माजी प्रधानमंत्री, भारतरत्न राजीव गांधी यांची ७५ वी जयंती साजरी

0
22
लाखनी,दि.26ः  देशाचे माजी प्रधानमंत्री, संगनक क्रांतीचे जनक भारतरत्न राजीव गांधी यांची ७५ वी जयंती लाखनी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने साजरी करण्यात आली. माजी आमदार सेवकभाऊ वाघाये यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तालुकाध्यक्ष सुनील गिरेपुंजे, शहराध्यक्ष विशाल तिरपुडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश कारेमोरे, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, जि. प. सदस्य विनायक बुरडे, ज्ञानेश्वर रहांगडाले, माजी जि. प. सदस्य जयकृष्ण फेंडरकर, पं.स. सदस्य दादुभाऊ खोब्रागडे, घनशाम देशमुख, सरपंच सुनिता भालेराव, भूषण टेंभूरणे, नगरसेवक दत्ता गिरेपुंजे, साकोली विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन निर्वाण, लाखनी तालुकाध्यक्ष प्रशांत वाघाये यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडले.
वयाच्या ४० व्या वर्षी पंतप्रधान बनलेले श्री. राजीव गांधी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते आणि आधुनिक विचार व अदभूत निर्णयक्षमता असलेले श्री. राजीव गांधी भारताला जगातील उच्च तंत्रज्ञानाने परिपूर्ण करू इच्छित होते. असे विचार माजी आमदार सेवकभाऊ वाघाये यांनी व्यक्त केले. डॉ. चंद्रकांत निंबार्ते यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, २१ व्या शतकातील भारत निर्माण करणे, हेही त्यांचे प्रमुख उद्दिष्ट होते. श्री. राजीव गांधी यांच्याकडे बरीच पुस्तके असत. शिवाय संगीतामध्ये त्यांना विशेष रुची होती. आज भारताला तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यात राजीव गांधींचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले.
              प्रास्ताविकाच्या माध्यमातून प्रशांत वाघाये यांनी सांगितले की राजीव गांधी यांच्यासारखे दूरदृष्टी लाभलेले प्रधानमंत्री देशाला लाभले आणि देशात संगणक क्षेत्रात क्रांती घडवली. दुर्दैवाने राजीव गांधींसारखं नेतृत्व अल्पावधीत काळाच्या पडद्याआड गेले. मात्र त्यांचं कार्य आजही युवकांसाठी प्रेरणादायी आहे आणि आज अशा नेतृत्वाची देशाला गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत वाघाये यांनी तर आभारप्रदर्शन मोहन निर्वाण यांनी केले. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश कारेमोरे, राजू निर्वाण, योगेश झलके, प्रिया खंडारे, गोविंद मेघराजानी, प्रदीप तितिरमारे, दुर्गेश चोले, अनिल बावनकुळे, धनपाल बोपचे, मंगेश धांडे, गीता मेहर, नंदू चौधरी, निखिल सिंगनजुडे, सोहेल मेमन, रीतेश कांबळे, भुदेव कींदरले, अविनाश बावणे, सोनू फेंडरकर, सूरज लांडगे, आशिष नागलवाडे, अजिंक्य वाघाये, मंगेश धांडे, शेखर सार्वे, अजय गायधनी दर्वेश दिघोरे, आदी उपस्थित होते.
blank