28.6 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home राजकीय काँग्रेसच्या महापर्दाफाश यात्रेला गोंदिया तालुका,शहर काँग्रेसचा धक्का

काँग्रेसच्या महापर्दाफाश यात्रेला गोंदिया तालुका,शहर काँग्रेसचा धक्का

0
26

गोंदिया,दि.28ः-राज्यातील विद्यमान सरकारविरुध्द काँग्रेसच्यावतीने अमरावती जिल्ह्यातून 26 आगस्टपासून महापर्दाफाश यात्रेला सुरवात करण्यात आली.अमरावती येथून सुरु झालेल्या यात्रेला सत्तारुढ पक्षाच्या महाजनादेश यात्रेसारखा स्वरुप नसला व प्रतिसाद नसला तरी विरोधी पक्षाच्या तुलनेत जे पाठबळ मिळायला हवे होते.ते सुध्दा तेवढ्या मोठ्याप्रमाणात नसले तरी भंडारा जिल्ह्यात या यात्रेचे जोरदार स्वागत करीत भंडारा व तुमसर येथील सभा सुध्दा चांगल्या पार पडल्या.परंतु ही यात्रा गोंदिया जिल्ह्यात येताच निष्क्रिय जिल्हाध्यक्षाचा कार्यप्रणालीचा फटका या यात्रेला बसल्याची चर्चा सुरु झाली आहे.त्यातच रात्री उशीरापर्यंत तिरोडा येथील सभा आटोपल्यानंतर गोंदियात पोचलेल्या या महापर्दाफाश यात्रेसोबत दुसर्या दिवशी बुधवार(दि.28)ला हजर होऊन यात्रेचे प्रमुख व काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख माजी खासदार नाना पटोले व त्यांच्या चमूसोबत पुढच्या ठिकाणच्या यात्रेतसहभागी होण्यासाठी गोंदिया शहर व तालुका काँग्रेसचा एकही पदाधिकारी न फिरकल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.स्थानिक आमदारांच्या कार्यक्रमांना वेळेवर गर्दी जमविणारे व हजर राहणारे एकही पदाधिकारी गोंदियातून जेव्हा महापर्दाफाश यात्रा गोरेगाव,सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगावकरीता रवाना झाली.त्यावेळी गोंदिया शहर व तालुका काँग्रेसचा एकही पदाधिकारी हजर न राहिल्याने शहर व तालुका काँग्रेसनेच काँग्रेसच्या महापर्दाफाश यात्रेचा पर्दाफाश करीत आमचे येत्या निवडणुकीत काही खर नाही हे दाखवल्याचे बोलले जात आहे.गोंदियातील या प्रकरणाची दखल प्रदेश काँग्रेसला सुध्दा घेण्याची वेळ आली असून सर्वसामान्य काँग्रेस पदाधिकारी व जनतेसाठी काम न करणारे पदाधिकार्यामुळेच काँग्रेसच्या महापर्दाफाश यात्रेला गोंदिया शहरात आल्यापावल्याच जावे लागल्याची चर्चा सुरु झाली आहे.सोबतच विद्यमान काँग्रेसच्या आमदारांबद्दल जे पक्ष बदलणार अशी चर्चा आहे,त्यावर या अनुपस्थितीनेही काहीप्रमाणात शिक्कामोर्तब झाल्याचे अनधिकृत बोलले जात आहे.

blank