*घोषणाबाज सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी ही यात्रा*
अर्जुनी मोरगाव,दि.28ः-खूप दिवसांनी योगा योगांने जिल्ह्यात पाच वर्षाकरिता मंत्रिपद मिळाले,वाटले होते आपल्या क्षेत्रातील सर्व प्रश्न मार्गी लागतील सर्व अडीअडचणी सुटतील क्षेत्राचा संर्वांगीन विकास होईल मात्र तोही मंत्री आरएसएसच्या नियमात न बसल्याने परीक्षेत नापास झाला म्हणून अवघ्या दोन महिने असतांना त्याच मंत्रिपद काढून घेतले अशी खरमरीत टिका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली.स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव येथे आज दि (२८) रोजी महा पर्दाफाश सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की भाजप मध्ये केवळ काही मोजक्या लोकांचं चालते त्यांना बहुजन,आदिवासी,चालत नाही.
स्वतःला विकास पुरुष म्हणणारे जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून,जनतेच्या पैशानी यात्रा काढणाऱ्या व घोषणाबाज सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी ही यात्रा काढली. मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर धानाला भाव,विद्युत बिलात सवलत, अनुसूचित जाती जमातींना आरक्षण लागू करू या सरकारने केवळ नाममात्र कर्ज माफी केली,प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू केली आणि शेतकऱ्यांच्या विम्याचा पैसा अदानी-अंबानीच्या कंपन्याना दिला,वारंवार पाच वर्षे सलग दुष्काळ पडूनही या चुकीच्या आणेवारी पद्धतीमुळे शेतकऱ्यांना एक दमडी सुद्धा दिली नाही,बी एस एन एल सेवा बंद पडून अदाणी अंबानी याना मोकळं रान केलंय,राज्य परिवहन महामंडळाच्या बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेच्या माध्यमातून प्रतिदिन ६८ लक्ष रुपये मातोश्रीला जातात,या फडणवीस सरकारने अतिरिक्त शेष नावाने तर डिझेल पेट्रोल वर दुष्काळ निवारण कर लावून दर महिन्याला साडे तीन हजार कोटी रुपये भाजपच्या तिजोरीत जमा केले.शेतकरी,शिक्षक,कामगार,व्यापारी सर्व नौकारदार याना त्रासवून सोडलं आहे त्यामुळे आता या घोशनाबाज सरकार ला अखेरचा निरोप देण्यासाठी आपण सज्ज व्हा तयार राहा आणि सर्व जाती धर्माला सोबत करून विकासाच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या काँग्रेसची सरकार आपल्या राज्यात आणण्यासाठी मला साथ द्या असेही आवाहन त्यांनी केले.यावेळी मंचावर श्याम पांडे उपाध्यक्ष भारतीय किसान मजदूर काँग्रेस संघटना,महिला काँग्रेस महासचिव शिला पटले,नगराध्यक्ष किशोर शहारे,जि.प.सदस्य, गिरीष पालिवाल, अमर वऱ्हाडे, आनंदकुमार जांभुळकर, श्रीकांत घाटबांधे युवक काँग्रेस गोंदिया, ई प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक भागवत नाकाडे,सूत्रसंचालन रत्नदीप दहीवले,तर आभार ठवरे यांनी केले.





