गोरेगाव,दि.26ःस्थानिक किरसान मिशन व जुनिअर कॉलेज गोरेगाव येथे विद्यार्थ्यांच्या मानसिक बौद्धिक आणि सर्वागिंण विकासाकरिता बालसभेचे आयोजित करण्यात आले होते.विविध विषयावर बालसभेद्वारे वैचारिक सहसबंध प्रस्थापित करून कार्यक्रम घेण्यात आले.विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.शाळेचे प्राचार्य डॉ. विनोद उके श्रीमती. गीता जगणित मीरा साठवणे, ममता चौधरी, व सुभाष चुलपार, सचिन रामटेके, धर्मेंद्र राऊत, उपस्थित होते.
गणित संबोध परीक्षेत सुयश
गोरेगाव :-स्थानिक किरसान मिशन स्कूल गोरेगाव व जुनियर कॉलेज येथील विद्यार्थीनी त्रीवेणी महाप्रकाश बीजेवार हिने जिल्यात प्रथम क्रमांक पटकाहून गणित संबोध परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले.तसेच शाळेमध्ये प्रथम आलेले कु. ऋचीं दामोदर बिसेन, शर्वरी भास्कर बहेकार यांनी सुद्धा सदर परीक्षेत यश संपादन केले. प्राचार्य ड्रा.विनोद उके, श्रीमती गीता जगणित, मंगला जांभूळकर सुभाष चुलपार, सचिन रामटेके, धर्मेन्द्र राऊत, यांनी सर्व विद्यार्थिनीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.




