30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home शैक्षणिक प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल शाळेत ‘ग्रँड पॅरेंट्स डे’ उत्साहात

प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल शाळेत ‘ग्रँड पॅरेंट्स डे’ उत्साहात

0
73

गोंदिया,दि.01 : श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था, गोंदियाद्वारे संचालित प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल शाळेत ‘ग्रॅडपॅरेंट्स डे’ उत्साहात साजरा करण्यात आला.सध्याच्या धावपळीच्या जीवनात लहान मुलांवर चांगले संस्कार व त्यांना संस्कृतीची माहिती व्हावी, यासाठी घरातील वयोवृध्द व्यक्तीचे काय महत्व असते, हे पटवून देण्यासाठी प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल शाळेने ‘ग्रँडपॅरेंट्स डे’ चे आयोजन केले. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांनी मोठय़ा संख्येत सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात शारदा मातेच्या छायाचित्राला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी संस्थापिक उमा कटकवार, संस्थाध्यक्ष डॉ.पंकज कटकवार, संस्थेचे सचिव डॉ. नीरज कटकवार उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका भावना कदम, अफसाना पठाण, एम.एम.माहुरे, आशा माहुरे, गजाधर शर्मा, विनयप्रसाद मिर्शा, शशिकला मिर्शा, प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, वाय.आशा राव उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना नृत्य, भाषण, कविता, गीत सादर केले. संसथाध्यक्षांनी उपस्थित सर्व आजी-आजोबांचे आभार मानून त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. संस्थेच्या सचिवांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले की, नेहमी आपल्या घरातील वयोवृध्द व्यक्तीचा आदर करून त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करायला पाहिजे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थाध्यक्ष, संस्था सचिव वाय.आशा राव व प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल शाळेच्या कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.