37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home क्रीडा जिल्हास्तरीय दौड स्पर्धेत प्रिन्सी नागनाथेचे यश 

जिल्हास्तरीय दौड स्पर्धेत प्रिन्सी नागनाथेचे यश 

0
34

गोंदिया : येथील मरारटोली परिसरातील जिल्हा क्रिडा संकूल येथे शालेय शिक्षण विभागांतर्गत जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेचे आयोजन शुक्रवारी ११ आॅक्टोबर रोजी करण्यात आले होत़े ज्यामध्ये गोरेगाव तालुक्यातील घोटी येथील सरस्वती प्राथमीक, माध्यमीक व उच्च माध्यमीक विद्या मंदिर येथील ९ व्या वर्गाची विद्यार्थीनी प्रिन्सी अविनाश नागनाथे हिने १४ वर्षाखालिल वयोगटातून २०० मीटर दौड स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला़ स्पर्धेत जिल्ह्यातील आठही तालुक्यातील १६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता़ ज्यामध्ये प्रिन्सीने द्वितीय क्रमांक पटाकवून नागपूर येथे ३० व ३१ आॅक्टोंबर दरम्यान होणाºया विभागस्तरीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे़
प्रिन्सीच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या माध्यमीक विभागाच्या मुख्याध्यापिका शकूंतला बघेले, प्राथमीकच्या मुख्याध्यापिका दुर्गा रहांगडाले, प्रशिक्षक सुरेश येडेकर, राजेश कोटांगले, माधूरी अगडे, माहेश्वरी नागनाथे, आरती राणे, गुड्डया, परमानंद दमाहे, तेजराम चव्हाण व इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनी अभिनंदन केले आहे़ प्रिन्सीने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व वर्गशिक्षक यांना दिले आहे़

blank