43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home राजकीय मला स्वतःहून युती तोडायची नाही, आता भाजपने निर्णय घ्यावा – उद्धव ठाकरे

मला स्वतःहून युती तोडायची नाही, आता भाजपने निर्णय घ्यावा – उद्धव ठाकरे

0
59

मुंबई,दि.०७ :मला स्वतःहून युती तोडायची नाही, लोकसभेवेळी जो फॉर्मुला ठरला होता त्याप्रमाणे व्हावे. आता भाजपने निर्णय घ्यावा असे वक्तव्य उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक गुरुवारी दुपारी पार पडली. यावेळी ते आमदारांशी संवाद साधताना बोलत होते. शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहे. लोकसभेवेळी जे ठरले होते तेच व्हावे आणि उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचे आमदारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

भाजप शिवसेनेचे आमदार फोडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आले होते. यानंतर उद्धव ठाकरेंनी सर्व आमदारांना बैठकीसाठी मातोश्रीवर बोलावले होते. दरम्यान तुम्ही आमदार फोडूनच दाखवा असे आव्हान यावेळी आमदारांनी केले. बैठकीदरम्यान सर्व आमदारांचे मोबाइल बाहेर ठेवण्यात आले होते. या बैठकीनंतर आमदारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे ठाम मत आमदारांनी व्यक्त केले. या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार हॉटेल रंगशारदाकडे रवाना झाले.

blank