24.4 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home क्रीडा तावसी / खुर्द येथे रात्रकालीन कब्बडी स्पर्धेचे उदघाटन

तावसी / खुर्द येथे रात्रकालीन कब्बडी स्पर्धेचे उदघाटन

0
44

अर्जुनी मोर,दि.07 :- युवा क्रिडा मंडळ तावसी खुर्दच्या सौजन्याने रात्रकालीन प्रो कबड्डी स्पर्धेचे उदघाटन शिवाजी चौक तावसी येथे पार पडले. अध्यक्षस्थानी पं.स.सभापती अरविंद शिवनकर होते.स्पर्धचे उदघाटन तालुका भाजपा अध्यक्ष उमाकांत ढेंगे यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी कृऊबा संचालक नुतन सोनवाने, व्यंकट खोब्रागडे, पत्रकार सुरेंद्रकुमार ठवरे, भाजपा महिला आघाडी अध्यक्षा मंजुषा तरोणे, महासचिव मिना शहारे, खेमराज लाडे,यशोधरा शहारे, सुषमा पुराम,दर्शना शहारे, पो.पा.सोमाजी शहारे, धनंजय जांभुळकर, गुरुदास ब्राम्हणकर, दिलीप शहारे, व अन्य मान्यवर उपस्थित होते.
सर्व प्रथम भगवान बजरंगबली,छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांचे प्रतिमांना माल्यार्पण व दिप प्रज्वलन करून कबड्डी स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.
दि.5/11/2019 ते अंतिम सामन्यापर्यंत आयोजीत या स्पर्धेत प्रथम पुरस्कार 11111 रुपये, द्वितीय पुरस्कार 7777 रुपये, तृतीय पुरस्कार 5555 रुपये ठेवण्यात आले आहे. ही स्पर्धा 60 किलो वजनाखालील गटासाठी ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेत विविध गावातील चाळीस संघांनी भाग घेतला आहे.
यावेळी कबड्डी स्पर्धेकांना मार्गदर्शन करताना सभापती अरविंद शिवनकर म्हणाले की आजच्या तरुणांनी इंग्रजी खेळासोबतच कबड्डी सारख्या स्वदेशी खेळाला महत्व द्यावे.खेळाच्या स्पर्धाचे आयोजना सोबतच गावविकासासाठी सर्वांनी एकत्रीत येवुन गावाचा विकास करावा.असेही शिवनकर यांनी सांगितले, उदघाटक उमाकांत ढेंगे यांनी गावात आयोजित या स्पर्धामुळे तरुणांमधे एक सांघीक भावना निर्माण होवुन गावखेड्यातही उत्तम दर्जाचे खेडाळु निर्माण होवु शकतात. कबड्डी स्पर्धामुळे तरुणांचे शरीर सुदृढ होते.
यावेळी पत्रकार सुरेंद्रकुमार ठवरे यांनीही मार्गदर्शन केले. संचालन माजी सरपंच दिलीप शहारे यांनी तर उपस्थितांचे आभार स्पर्धेच्या आयोजीका व मार्गदर्शिका मिना शहारे यांनी केले.यशस्वीतेसाठी युवा क्रिडा मंडळ तावसी खुर्द चे नरेंद्र ब्राह्मणकर, महेंद्र कोहरे,संतोष कोरे,आशिष फुन्ने,अजय कुंभरे,दुर्गेश कोहरे,विनोद कोहरे,रामदास सोनवाने, राजेश फुन्ने,सुभाष कुंभरे, आशिष नंदेश्वर,दिनेश सोनवाने यांनी परिश्रम घेतले.