26.3 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home शैक्षणिक शिक्षण विभागाला रिक्त पदाचे ग्रहण

शिक्षण विभागाला रिक्त पदाचे ग्रहण

0
45

गोरेगाव,दि.15ः- राज्याच्या शालेय शिक्षण विभाग तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून नवनवीन उपक्रम रबाविण्यात येत असताना रिक्त पदाचे टेन्शन या विभागाला भेडसावत असल्याचा प्रकार गोरेगाव येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागात दिसून येत आहे. मुख्य म्हणजे, येथील गटशिक्षणाधिकार्‍यांच्या पदासह केंद्रप्रमुख शिक्षक अशी ३४ पदे रिक्त पडून आहेत. विशेषत आठ शाळा या उच्चश्रेणी मुख्याध्यापकाविनाच असल्याचे पुढे आले आहे.
एकीकडे शाळाबाह्य मुलांचा शोध घâेन त्यांचा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जात आहे. समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची होणारी गळती थांबवावी, यासाठी उपक्रम राबविले जात असताना दुसरीकडे मात्र त्याच विभागात महत्वाची पदे रिक्त असल्याने संबधित विभागाच्या कार्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एकट्या गोरेगाव तालुक्याचा विचार केल्यास तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १०८ प्राथमिक व १ माध्यमिक शाळा आहे. आजघडीला वर्ग १ ते ५ पर्यत ५ हजार ७०५, तर इयत्ता ६ ते ७ वीपर्यत १ हजार ८१६ असे ७ हजार ५२१ विद्यार्थी अध्ययनरत आहेत. असे असले तरी शिक्षण विभागातील मंजूर व रिक्त पदांचा आढावा घेतल्यास येथील पंचायत समितीतील गटशिक्षणाधिकारीचे पद प्रभारीच्या खाद्यावर देण्यात आले असल्याचे जाणवते. त्यातच विस्तार अधिकार्‍याची ४ पदे मुंजूर असताना यापैकी दोन पदे भरलेली असून दोन पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे केंद्र प्रमुखांच्या ९ पदांना मंजुरी देण्यात आली असताना ेवळ ३ पदे भरण्यात आली तर ६ पदे रिक्त आहेत. उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची २२ पदे मंजूर असताना ८ पदांना ग्रहण लागले आहे. त्याचबरोबर पदवीधर शिक्षकांच्या मंजूर १०२ पदांपैकी ८८ पदे भरण्यात आली असून १४ रिक्त पदांचे टेन्शन शिक्षण विभागाला आहे. सहाय्यक शिक्षकांचीही २९४ पदांपैकी ३ पदे रिक्त आहेत. परिणमी एका शिक्षकाचा भार दुर्‍या शिक्षकावर आणि मुख्याध्यापकाचा भार पदवीधर शिक्षकांवर असा कार्यक्रम सद्या गोरेगाव शिक्षण विभागाकडून सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. रिक्तपदांमुळे प्रभार देण्यात आलेल्या कर्मचार्‍यांवर अतिरिक्त कामाचा बोझा वाढला आहे.

आठ शाळा मुख्याध्यापकाविना
शालेय पोषण आहारापासून तर इतर महत्वाची कामे मुख्याध्यापकांवर असतात. अशात मुख्याध्यापकाचेच पद रिक्त असल्याने सदर शाळेच्या नियोजनावर याचा प्रभाव पडतो. अशात गोरेगाव तालुक्यातील मोहगाव/तिल्ली, म्हसगाव, तुमखेडा बु, गणखैरा, सर्वाटोला, गिधाडी, कटंगी बु.हिरडामाली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना उच्चश्रेणी मुख्याध्यापकाचे पद मंजूर असताना आठ शाळा उच्चश्रेणी मुख्याध्यापकाविना आहेत.