26.3 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ घंटागाडीवर साऊंड सिस्टिमचा वापर; गोरेगाव नगरपंचायतीचा उपक्रम

घंटागाडीवर साऊंड सिस्टिमचा वापर; गोरेगाव नगरपंचायतीचा उपक्रम

0
100

गोरेगाव,दि.15 : स्वच्छतेचा संदेश व स्वच्छ नगर यासाठी येथीन नगर पंचायतीने नवी शक्क लढवली. घंटागोडीवर साऊंड सिस्टिमचा वापर करून गीत, संगीताव्दारे शहरातील ओला कचरा, सुका कचरा गोळा करण्याचे काम जोमाने सुरू आहे. त्यामुळे स्वच्छता कर्मचारी सकाळी ७ वाजता ठरवून दिलेल्या प्रभागातील दरवाजांजवळ घंटागाडी उभी करून गाडीवाला आया, घर से कचरा निकाल असे गीत सुरू करतो. प्रत्येक घरातील सदस्य या घंटागाडीची वाट पाहत असतात. घरातूनओला कचरा, सुका कचरा घंटागाडीत टाकतात. त्यामुळे स्वच्छता कर्मचार्‍यांना टाकाऊ वस्तू गोळा करण्यासाठी हा उपक्रम उपयोगी ठरला आहे.
या नवीन उपक्रमामुळे दररोज सुका कचरा हा ३०० किलो, ओला कचरा ९०० किलो गोळा होत आहे. नगरपंचायत घनकचरा व्यवस्थापन केंद्रात कचरा गोळा करीत असून सामान्य फंडात दुप्पट वाढ झाली आहे. ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा करून घंटागाडीत टाकण्यासाठी ३८ स्वच्छता कर्मचार्‍यांना जबाबदारी सोपविण्यात आली होती. के कर्मचारी व्हिसल वाजवूनकचरा गोळा करण्याचे काम करीत होते. परंतु, या कर्मचार्‍यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे स्वच्छता कर्मचार्‍यांना उत्साहीत करण्यात यावे व नागरिकांत स्वच्छतेबाबत जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने नगरपंचयतीने नवी शक्कल लढवली व प्रायोगिक तत्वावर घंटागाडीत साऊंड सिस्टिमचा वापर केला. या प्रयोगाला नागरीक प्रतिसाद देत असल्याचे नगराध्यक्ष आशीष बारेवार यांनी सांगितले.

blank