तिरोडा,दि.30 : महाराष्ट्र शासन विविध योजना राबवून ग्राम विकासात मोठा योगदान देवून गावाला विकास दर्जा वाढावा, यासाठी विविध योजना राबवित आहेत. त्यातच शासन ‘स्मार्ट ग्राम’ योजना राबवित असून त्यात तिरोडा तालुक्यातील अर्जुनी गावाचा समावेश आहे. दरम्यान अर्जुनी गावाला सर्वेक्षण चमूनी भेट देवून पाहणी केली. जिल्हा परिषद गोंदियाच्या वतीने यापुर्वी तालुका स्तरावर तालुका स्मार्ट ग्राम पंचायत स्पर्धा घेण्यात आली. यात जिल्ह्यातील ८ ग्रामपंचायती तालुका स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्काराने सन्मानित झाल्या. तिरोडा तालुक्यातील अर्जुनी ग्रामपंचायतने तालुका स्तरीय प्रथम पुरस्कार मिळवून जिल्हा स्तरीय ‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धेत सहभाग घेतला. सन २०१८-१९ स्मार्ट योजने अंतर्गत तिरोडा तालुक्यात सर्वाधिक गुण मिळवून अर्जुनी ग्रामपंचायत ‘तालुका स्मार्ट ग्राम’ नी पुरस्कृत झाली म्हणून जिल्हा स्मार्ट ग्राम स्पर्धेत सहभाग घेतला.याचे पुन:मुल्याकन करण्यासाठी जिल्हा स्तरीय तपासणी चमून गावाला नुकतीच भेट दिली. यात जि.प.चे सीईओ राजा दयानिधी, अति.मु.का.अ. हाश्मी, उप मुकाअ भांडारकर, जिल्हा कृषी अधिकारी शुक्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी श्याम निमगडे, गिर्हेपुंजे, लिल्हारे, धारगावे व इतर अधिकार्यांनी भेट देवून तपासणी केली. यावेळी ग्रा.वि.अ. सोनवाने, सरपंच, पदाधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्यातील ८ ग्रामपंचायती जिल्हा स्मार्ट ग्राम स्पर्धेत सहभागी असून ‘जिल्हा स्मार्ट ग्राम’ ने कोणती ग्रा.पं. पुरस्कृत होते, याकडे लक्ष लागले आहे.





