25.6 C
Gondiā
Thursday, July 2, 2026
Home गुन्हेवार्ता 4 लाखाचा अवैध दारुसाठा साहित्यासह जप्त

4 लाखाचा अवैध दारुसाठा साहित्यासह जप्त

0
44

नागपूर,दि.02 : राज्य उत्पादन शुल्क विभागाने गिट्टीखदान पोलीस स्टेशन हद्दीतील भिवसन खोरी येथील हातभट्टी दारु निर्मिती तसेच कळमना व पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारु विक्रीच्या सहा ठिकाणाव छापे टाकून 4 लाख 38 हजार 450 किमतीचा मु्द्देमालासह 10 आरोपींना ताब्यात घेतले आहे. नागपूर परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनिता साहू व विभागीय उपायुक्त मोहन वर्दे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने, उपअधीक्षक ज्ञानेश्वरी अहेर,सुनील मिरकले यांच्या मार्गदर्शनात पोलीस विभागाला सोबत घेत ही मोहीम  निरीक्षक रावसाहेब कोरे यांच्या पथकाने पार पाडली.या कारवाईत रसायनाने भरलेले 200 लिटर क्षमतेचे 35 प्लास्टिक,42 लोखंडी ब्यारेल्स व 35 लिटर क्षमतेचे 130 प्लास्टिक ड्रम, 200 लिटर क्षमतेचे 15 भट्टी ब्यारेल्स, हातभट्टी दारुने भरलेले 35 लिटर क्षमतेचे 10 व 10 लिटर क्षमतेचे 12 प्लास्टिक कॅन,15 लिटर क्षमतेचे लोखंडी 30 पत्र्याचे डबे, अकरा हौस पाईप्स व चाटू, चार जर्मन पातेली तसेच तसेच 23 लिटर देशी दारू अशाप्रकारे 4 लाख 38 हजार 450 किंमतीचा अवैध दारु निर्मितीतील साहित्य जप्त करुन नष्ठ करण्यात आले.
या कारवाईत किसन सुकरित रंभाड,प्रदीप तुळशीराम मसादे,दिलीप आसाराम अडभय्या, हंसा मनोज कोसरे,शबाना सलमानखा पठाण,सुमित्राबाई राजेश बोरकर,अमर कैलास डोंगरे,इंदूबाई जनार्दन घोडेस्वार,सौ.शाहू किरण पाटील व रंजन कपूरचंद सोनटक्के याना ताब्यात घेण्यात आले.या कारवाईमध्ये निरीक्षक रवींद्र शितोळे, दुय्यम निरीक्षक नरेंद्र बोलधने, राजेश मोहोड, पोलीस निरीक्षक सुनील गांगुर्डे, PSI साजिद अहमद, ASI कवडू रामटेके, HC अनिल जैन व चंद्रशेखर घोरमाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी महादेव कांगणे, शिरीष देशमुख, सुधीर मानकर, रमेश कांबळे, महिला जवान सोनाली खांडेकर,वाहन चालक रवी निकाळजे आदी सहभागी झाले होते.