गोंदिया,दि.१७ः- येथील संत तुकाराम हायस्कुल कुडवा नाकाच्या प्रागंणात हलबा हलबी समाज महिलांचा मेळावा रविवार १९ जानेवारीला सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्याचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांच्या हस्ते होणार आहे.तर माजी सभापती आरती चवारे,बालाघाटच्या तहसिलदारस अनिता भोयर,सालेकसा पंचायत समिती सभापती अर्चना राऊत उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.यावेळी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला समाजातील महिलांना मोठ्या ंसख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मा दंतेश्वरी महिला बचतगट व विविध महिला बचत गटांनी केले आहे.




