तिरोडा,दि.23- राज्यात कोरोणा विषाणूने थैमान घातले असून गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने अतिआवश्यक कामे सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचित केल्याने तिरोडा तालुक्यात अतिआवश्यक कामांनुसार मंजुरी देण्यात यावे.तसेच शेतीविषयक कामांना प्राधान्य देणे गरजेचे असून तलाठी व कृषीसेवक यांना मुख्यालयी राहण्याबाबत आदेशित करण्यात यावे अशी मागणी आमदार विजय रहागंडाले यांनी केली आहे.यावेळी आ.रहागंडालेनी खबरदारीचा उपाय म्हणून आयसोलेशन केंद्र निर्माण करणे, पीएम किसान सन्मान निधीचा लाभापासून वंचित असलेल्या शेतक-यांचे तत्काळ रजिस्ट्रेशन करून लाभ देणे, बीपीएल एपीएल व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना योग्य वेळी लाभ देणे,घरकुल बांधकामाकरिता ५ ब्रास वाळूची परवानगी देणे अश्या अनेक महत्त्व पूर्ण विषयावर उपविभागीय अधिकारी गंगाधर तळपाडे यांचेशी सोशल डीस्टन्सिंगचा वापर करून चर्चा केली.यावेळी भाजप तिरोडा तालुका शहरअध्यक्ष स्वानंद पारधी,मदनभाऊ पटले उपस्थित होते.





