42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय आरोग्य विभागाने काढलेल्या जाहिरातीमध्ये ओबीसीवर झालेल्या अन्याय खपवून घेणार नाही : खासदार...

आरोग्य विभागाने काढलेल्या जाहिरातीमध्ये ओबीसीवर झालेल्या अन्याय खपवून घेणार नाही : खासदार धानोरकर

0
191

चंद्रपूर दि २६ :-: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, चंद्रपूर अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत ओबीसी उमेदवारांना एकही जागा कोणत्याही पदासाठी आरक्षित करण्यात आलेली नाही. ओबीसी बेरोजगारांवर झालेला अन्याय असुन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून ओबीसी बेरोजगारांना न्याय द्यावा अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांच्याकडे केली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, चंद्रपूर जाहिरात क्र. 1,सन 2020-2021 च्या जाहिराती मध्ये ओबीसी उमेदवारांना एकही जागा कोणत्याही पदा साठी दिसत नाही आहे, जिल्हा मोठया प्रमाणात ओबीसी समाज असून हा समाजावर झालेला अन्याय आहे. जेव्हा की सामान्य प्रशासनाच्या परिपत्रक नुसार दिनांक 16 आगस्ट 2019 व 21 आगस्ट 2019 चे बिंदूनामावलीचे दोन्ही परिपत्रक, शासनाने हे बिंदूनामावलिचे प्रतिपत्रक 22 आगस्ट 2019 परिपत्रक कडून रद्द केले आहेत. त्यानंतर कोणतेही सुधारित बिंदूनामावलीचे परिपत्रक निघाले नसताना कोणत्या आधारावर आरोग्य विभागाने काढलेले आरक्षण ठरविण्यात आहे आहेत? कोरोना संकटाच्या काळात आरोग्य विभागाने जागा भरल्या पाहिजेत यात दुमत नाही, परंतु ओबीसी बेरोजगारांवर सुद्धा अन्याय होता कामा नये, याबाबीवर आपण लक्ष घालून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून ओबीसी बेरोजगारांना न्याय द्यावा तसेच हि जाहिरात रद्द करून ओबीसी आरक्षण असणारी नवीन जाहिरात काढण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांना केली आहे.

blank