32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ यवतमाळ जिल्हय़ात ७५ तर अमरावतीत २७ पॉझिटिव्ह

यवतमाळ जिल्हय़ात ७५ तर अमरावतीत २७ पॉझिटिव्ह

0
353

blank

भंडारा/अमरावती/यवतमाळ,दि.29ः कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसागणिक वाढतच आहे. सोमवारी यवतमाळ जिल्ह्य़ात आणखी ६ रुग्ण वाढले असून बाधितांची संख्या ७५ झाली आहे तर अमरावती जिल्ह्य़ात चार रुग्णांची भर पडली असून संख्या २७ झाली आहे. रविवारी भंडारा जिल्ह्य़ात पहिल्यांदाच आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १३0 जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्हय़ात आणखी सहा पॉझिटिव्ह, संख्या ७५ वर
आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या ६ रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अँक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ७५ वर पोहचली आहे. गत तीन दिवसांत २४ ते २७ एप्रिल या कालावधीत एकूण ३९३ नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले. यापैकी पूर्ण ३९३ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कालपयर्ंत पाठविलेले एकाही नमुन्याचे अहवाल आता प्रलंबित नाही. आतापयर्ंत तपासणीकरिता पाठविलेल्या नमुन्यांची संख्या एकूण ११५0 आहे, असे प्रशासनाने कळविले आहे.
भंडारा जिल्हय़ात १३0 जण क्वारंटाईन
भंडारा तालुक्यातील गराडा बु. येथील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तिच्या संपर्कात आलेले १५ हाय रिस्क व १३0 लो रिस्क व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. जिल्ह्यात करोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली असून गराडा गावासह परिसरातील गावांमध्ये आरोग्य चमूमार्फत सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या अहवालानंतर आरोग्य यंत्रणेसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली.
अमरावती जिल्हय़ात २७ पॉझिटिव्ह
जिल्हय़ात आणखी ४ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून जिल्हय़ातील एकूण रुग्णांची संख्या २७ वर पोहोचली असून ७ जणांचा मृत्यू, ४ जणांना डिस्चार्ज तर १६ रुग्णांवर उपचार सुरू आहे. खोलापुरी गेट येथील एक महिलेसह २0 वर्षीय युवकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.खोलापुरी गेट येथील दोन व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले होते. महिलेचे वय ४0 वर्षे आहे. मागील चार ते पाच दिवसात कोरोना पॉझिटिव्ह असणार्‍या रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

blank