25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ शासनाने पत्रकारांचा विमा करून आर्थिक मदत द्यावी : भालेकर

शासनाने पत्रकारांचा विमा करून आर्थिक मदत द्यावी : भालेकर

0
485

आमगाव,दि.29 : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सगळीकडे लॉकडाऊन आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रत्येकजण जिवाच्या भीतीने घरातच बसला आहे. त्यांचीच काळजी घेण्यासाठी पोलिस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्याप्रमाणे मुद्रित व इलेक्ट्रॉनिक्स प्रसारमाध्यमांचे पत्रकार बांधव सामाजिक बांधिलकी म्हणून स्वत:चा जीव धोक्यात घालून रस्त्यावर फिरतांना दिसत आहेत. लॉकडाउन काळात मोठमोठे उद्योग, शेती व शेतकरी, मजुरवर्ग, यांच्यासोबत पत्रकारांनाही आर्थिक फटका बसला आहे. शासन आरोग्य विभाग, पोलीस विभाग यांना ५० लाखांचा विमा देऊन त्यांच्या कुटूंबाला सुरक्षा प्रदान करीत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना देखील मुद्रित व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचे पत्रकार जीव धोक्यात घालून पत्रकार आपले कर्तव्य बजावीत आहे. या सर्व पत्रकारांना सुद्धा शासनाने विमा करून त्यांचा कुटूंबाला विमाचा लाभ द्यावा, अशी मागणी आमगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष इसुलाल भालेकर यांनी केली आहे.
लोकशाहीचा चौथ स्तंभ असलेला मिडीया क्षेत्रात काम करणारे पत्रकार हे कुणाची व्यथा तर कुणावर ओढवलेले संकट, कुणी जनतेची लुबाडणूक करीत असेल तर शासनाकडे वृत्तपत्र च्या माध्यमातून सर्वप्रथम माहिती देतो तो पत्रकार , सर्व दैनंदिन घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवून अशा कठीण परिस्थितीत कर्तव्य चोखपणे बजावणारे पत्रकार बांधव अन् त्यांचा परिवार कसा आहे ? त्यांना काही अडचण तर नाही ना…? असा क्षणीक दिलासादायक एकही शब्द अथवा फोन ऐकावयास मिळत नाही. जग भीतीपोटी चार भिंतीच्या आत लपत आहे. आणि पत्रकार लपणार्‍यांना सचेत करण्यासाठी बातम्या छापत आहे. त्याच प्रमाणे वृत्तपत्र हाकर एजंट याना सुद्धा शासनाने आर्थिक मदत केली पाहिजे.
ग्रामीण भागातील पत्रकार पगारदार नोकर नसतो त्याचप्रमाणे वृत्तपत्र हाकर एजंट सुद्धा कमिशन वर काम करतात आणि आपला उदरनिर्वाह करतात. वृत्तपत्र बंद झाल्यास पत्रकार, हाकर एजंट, यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. शासन ज्याप्रमाणे अन्य विभागातील कर्मचार्‍यांना आर्थीक मदत करते त्याचप्रमाणे सुविधा व आर्थिक मदत करावी अशी मागणी भालेकर यांनी केली आहे. भालेकर यांनी पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि विधानसभा अध्यक्ष नानभाऊ पटोले यांना निवेदनातून केली आहे.