25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home गुन्हेवार्ता परराज्यातून मजूर आणणार्‍या कंपनीवर गुन्हा दाखल

परराज्यातून मजूर आणणार्‍या कंपनीवर गुन्हा दाखल

0
327

गोंदिया ,दि.29 :: लॉकडाऊनचे उल्लंघन करून परराज्यातून मजूर आणणार्‍या मुंडीपार येथील एस. आर. फेरो कंपनीवर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशात लॉकडाउन असून राज्य व आंतराज्य सीमाबंदी लागू आहे. असे असतानाही नियमांचे उल्लंघन करुन जवळील मुंडीपार येथील एमआयडीसीमधील एस. आर. फेरो कंपनीने महाराष्ट्राबाहेरील ३ राज्यातून १२ मजुरांना कामावर आणल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी तलाठी प्रेमलता ठाकरे यांच्या तक्रारीवरुन गंगाझरी पोलिसांनी कंपनीवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.