
गोंदिया,दि.२९ः-गोंदिया तालुक्यातील रावणवाडी पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या रजेगाव येथील एचडीएफसी बँकेची तिजोरी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाèया आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासाच्या आत जेरबंद केले आहे.आरोपींना अटक केल्यानंतर २०१९ मध्ये रजेगाव येथे झालेल्या ७ घरफोडीच्या गुन्ह्याचीही उकल झाली आहे.सविस्तर असे की रजेगाव येथील एचडीएफसी बँकेमध्ये २४ एप्रिल ते २७ एप्रिलच्या सकाळी ६.३०वाजेदरम्यान बँकेच्या शटरला लावलेले कुलूप तोडून तसेच सीसीटीव्ही कॅमेराची तोडफोड करुन तिजोरी कटरने कापण्याचा प्रयत्न करुन दरोड्याचा प्रयत्न झाल्याची घटना २७ एप्रिल रोजी उघडकीस येताच रावणवाडी पोलीस ठाण्यात तंक्रार नोंदविण्यात आली होती.तक्रारीनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलीस अधिक्षक मंगेश कदम यांनी तपासासाठी स्वतंत्र पथकाची नेमणुक केली.त्यानंतर तपास पथकाने बँकेतील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता २७ एप्रिलच्या रात्री १.३० वाजेच्या सुमारास दोन व्यक्ती तोंडाला कापड बांधलेले बँकेत शिरून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आल्यानंतर चौकशीला सुरवात करण्यात आली.यादरम्यानच काटीजवळील सेरकाटोला येथील सुनिलकुमार श्रीराम ब्रम्हे(वय२६)यांने हा गुन्हा आपल्या साथीदारासंह केल्याचे समोर आल्यानंतर २८ एप्रिल रोजी कटंगी येथून ताब्यात घेण्यात आले.त्यानंतर विचारपूस केल्यावर या गुन्ह्यात महेंद्र ओमप्रकाश नागवंशी(वय-२०,रा.सेरकाटोला,जि.गोंदिया),तेजलाल गोवर्धन पंधरे(वय २८,रा.महालगाव,जि.बालाघाट) व अरqवद सुरजलाल दसेरे(वय २२,रा.हट्टा,जि.बालाघाट) यांनी मदत केल्याचे कबुल केले.त्यानंतर तपास पथकाने महेंद्र नागवशींला काटी येथून तर तेजलाल पंधरे व अरqवद दसेरेला बालाघाट जिल्ह्यातील हट्टा येथे सापळा रचून ताब्यात घेतले.या चौघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून २३ ते २६ ऑगस्ट २०१९ दरम्यान रजेगाव येथीलच एचडीएफसी बँकेत झालेल्या अशाचप्रकारच्या चोरीबाबत विचारणा केल्यावर ती चोरी सुध्दा केल्याचे कबुल केले.सोबतच गोंदिया ग्रामीण व रावनवाडी पोलीस ठाणेंतर्गतच्या काही गुन्ह्यातील कबुली दिल्याने कलम ४५४,४५७,३८० व ५११ अन्वये गुन्हा दाखल करुन ताब्यात घेण्यात आले आहे.याप्रकरणाचा तपास पोलीस अधिक्षक मंगेश qशदे,अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहा.पोलीस निरिक्षक रमेश गर्जे,उपनिरिक्षक तेंजेंद्र मेश्राम,पोलीस कर्मचारी लिलेंद्र बैस,गोपाल कापगते,विजय रहागंडाले,सुखदेव राऊत,चंद्रकांत कर्पे,भुवनलाल देशमुख,भुमेश्वर जगनाडे,रेखलाल गौतम,नेवालाल भेलावे,अजय रहागंडाले,विनोद गौतम,सायबर सेलचे पोलीस निरिक्षक राहुल शिरे,कर्मचारी दिक्षीतकुमार दमाहे,धनजंय शेडे,प्रभाकर पालादुंरकर,संजय मारवाडे,विनोद बैरय्या यांनी केला.आरोपीकडून २ चोरीच्या गुन्ह्यासह इतर ५ गुन्हे असे ७ गुन्ह्याचा तपास निकाली काढण्यात यश आले आहे.या सर्वांचे पोलीस अधिक्षक व अतिरिक्त पोलीस अधिक्षकांनी अभिनंदन केले आहे.





