कोल्हापूर(विशेष प्रतिनिधी)दि.07 – माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केले आहे.
काल छत्रपती छत्रपती शाहू राजांचा स्मृतीदिन असल्याने विविध क्षेत्रातली मंडळी आणि शाहूप्रेमी राजांना अभिवादन करत होते. विविध राजकारण्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहू राजांना अभिवादन करणाऱ्या पोस्ट केल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मात्र शाहूराजांना अभिवादन करताना चूक झाली. त्यांनी शाहूराजांना सामाजिक कार्यकर्ते असे विशेषण वापरले. लोकांनी फडणवीसांना याप्रकरणी चांगलंच धारेवर धरले. त्यानंतर त्यांनी संबंधित पोस्ट डिलीट केलं.
माझ्यासाहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. म्हणून फडणवीसांनी झाल्या प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.
दरम्यान, संभाजीराजे यांनी एक पोस्ट लिहून मी कोणत्या वेळी काय भूमिका घ्यावी, हे मला कुणी शिकवू नये. मी नेहमीच आमच्या घराण्याला शोभेल अशीच भूमिका घेतो, असे म्हणत त्यांच्या टीकाकारांना त्यांनी उत्तर दिले होतं





