26.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home गुन्हेवार्ता तहसीलदारांच्या गाडीवर टिप्पर चढविणार्या चार आरोपींना अटक

तहसीलदारांच्या गाडीवर टिप्पर चढविणार्या चार आरोपींना अटक

0
439
फाईल फोटो

पवनी,दि.14 : पवनी तालुक्यातून अवैधरित्या वाळुची तस्करी करणार्या वाळुमाफियांचे ट्रक थांबविणार्या पवनी तहसीलदारांच्या गाडीवर टिप्पर चढवून जिवे मारण्याचा प्रयत्न तसेच तलाठ्याच्या अपहरण प्रकरण घटनेतील चार आरोपींना पवनी पोलिसांनी अटक करून दोन टिप्पर व एक स्कॉर्पिओ जप्त केली.
पवनीचे तहसीलदार गजानन कोकर्डे हे मंडळ अधिकारी व तलाठीसह आपल्या वाहनाने भुयार-निलज मार्गाकडून अवैध वाळू वाहतूक करणार्या दोन टिप्परला थांबवून चालकाला वाहतूक परवाना मागितला असता विना परवाना वाळू वाहतूक करताना आढळून आल्याने टिप्पर तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी एका टिप्परवर तलाठ्याला बसवून नेण्यास सांगितले. मात्र टिप्पर मालकाच्या सांगण्यानुसार चालकांने टिप्पर नागपूरकडे नेण्यास सुरवात करताच टिप्परमध्ये बसलेल्या तलाठ्याचे अपहरण केल्याची बाब तहसीलदारांच्या लक्षात येताच त्यांनी टिप्परचा पाठलाग केला. भिवापूरजवळ तहसीलदारांनी सदरला टिप्परला ओव्हरटेक करून आपली गाडी टिप्परपुढे थांबविली असता टिप्पर चालकाने टिप्पर तहसीलदाराच्या गाडीवर चढविला. मात्र सुदैवाने तहसीलदार थोडक्यात बचावले. तहसीलदाराच्या सतर्कतेमुळे एका तलाठ्याचा अपहरणाचा प्रयत्न फसला. पवनी तालुक्यात वाळूमाफियांचे साम्राज्य असून तालुक्यातून वैनगंगेच्या गुडेगाव नदीपात्रातून मो’्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा करून लॉकडाऊनच्या काळातही अवैधरित्या वाहतूक केली जात आहे. याच घाटावर मागील महिन्यात पोलिस अधीक्षकांनी लग्नाच्या वर्हाडी समजून गुडेगाव घाटावर धाड घातली. ही जिल्ह्यातील मोठी धाड होती. त्यावेळी १९ टिप्पर व १२ जेसीबी जप्त केले होते. तेव्हापासून वाळूमाफिया संतापलेले होता. पवनी तहसीलदारांनी वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्वत: ही मोहीम राबवली. मात्र वाळूमाफियांच्या रोषाचा सामना तहसीलदारांसह मंडळ अधिकारी व तलाठी यांना करावा लागला. वाळूमाफियांनी पवनी तहसीलदारांच्या गाडीवर टिप्पर चढवून जिवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी मो. कलाम मो. अजीज खान, रबूल नयमूल खान, अतेकुल रहमान कादीर खान, सरफराज ऊर्पâ कल्लू स्कीम खान सर्व रा. नागपूर अशा चार जणांना अटक केली असून दोन टिप्पर व एक स्कॉर्पिओ जप्त केले आहे. याप्रकरणी आरोपीविरूध्द कलम ३०७, ३९२, ३५३, ३७९, ४२७, १८८, २६९, २७०, ५०४, ५०६, ३४ भादंवि आर.डब्लू.५१(बी) आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, आर.डब्लू.४८ (८) जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे करीत आहेत.