नवेगांवबांध (सतीश कोसरकर),दि.15ःलाखांदूर क्षेत्राचे माजी आमदार स्व.दयाराम कापगते यांच्या तृतीय स्मृतिप्रीत्यर्थ ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे रुग्णांना फळ व बिस्किट वितरण करण्यात आले.त्याप्रसंगी स्वर्गीय दयाराम कापगते यांचे पुत्र विलास कापगते,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एस.के.टंडन,डॉ.भोयर,डॉ.युगाताई कापगते,तलाठी पुंडलिक कुंभरे, सामाजिक कार्यकर्ता होमराज पुस्तोडे,नवल चांडक, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सतीश कोसरकर एकनाथ बोरकर,प्रकाश तरोणे,ग्रामीण रुग्णालयाचे सिस्टर प्रगती गणवीर,कक्षसेवक बारापात्रे,पितांबर काशीवार ,आदिवासी गोवारी संघटनेचे स्थानीय अध्यक्ष मुकेश पहाडे आदी उपस्थित होते.





