गोंदिया,दि.30ःदेश व राज्य कोरोना विषाणूच्या आपत्तीशी लढा देत आहे. विषाणू संसगार्चा वाढत्या प्रादुभार्वामुळे सर्वाधिक ताण आरोग्य विभागावर पडत असल्याने कौशल्य विकास विभागातंर्गत राबविण्यात येणार्या पॅरामेडीकल अभ्यासक्रमातील विद्यार्थी स्वयंस्फुर्ती वैद्यकीय सेवा देण्यास तयार आहेत. त्यामुळे कोरोना विषाणू लढ्यात या विद्यार्थ्यांची सेवा घेण्यात यावी, या संदर्भात जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रदिप घुले यांच्या मार्गदर्शनात एम.जी.पॅरामेडीकलचे संस्थापक अनिल गोंडाणे व निर्मल पॅरामेडीकलचे संस्थापक टेंभरे यांनी जिल्हा शल्यचिकीत्सकांना निवेदन दिले.
देशासह राज्यात कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराने थैमान घातला आहे. विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य, पोलिस, महसूल व शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. परंतु, याचा सर्वाधिक ताण आरोग्य विभागावर आहे. अशा स्थितीत सामाजिक ताण व कर्तव्य म्हणून कौशल्य विकास व उद्योजकता विभागातंर्गत महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळामार्फत डीएमएलटी पदविका अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. या अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पॅरामेडीकल वैद्यकीय कामे माहिती असून सध्या कोरोनाशी लढा देताना आरोग्य विभागाला पॅरामेडीकल स्टॉफची नितांत गरज आहे.
जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाच्या अधिपत्याखाली गोंदिया जिल्ह्यात एम.जी.पॅरामेडीकल व निर्मल पॅरामेडीकल गोंदिया या संस्थेत मोठ्या प्रमाणात पॅरामेडीकल अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी कोविड-१९ करीता आरोग्य सेवक म्हणून सेवा देण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर पडत असलेला ताण, अधिकचे मनुष्यबळ व सामाजिक बांधिलकीचा विचार करून दोन्ही पॅरामेडीकल संस्थेच्या विद्यार्थ्यांची आरोग्य सेवा कोविड-१९ करीता घेण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कायालयाचे दिपक राऊत, यशवंत बांडबुचे, अनिल भडांगे उपस्थित होते.




