39.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ जिल्हयातील ४६ खाजगी रुग्णालयात होणार कोविड रुग्णांवर उपचार

जिल्हयातील ४६ खाजगी रुग्णालयात होणार कोविड रुग्णांवर उपचार

कोविड व नॉन कोविड रुग्णांसाठी ८० टक्के खाटांची उपलब्धता एकुण ११७२ खाटांचा व ४१ व्हेंटीलेटरचा समावेश

0
628

गोंदिया दि.४ -: कोरोना विषाणूचा संसर्ग राज्यात वेगाने पसरतो आहे. त्यामुळे कोरोना बाधित व कोरोना संसर्ग नसलेल्या (कोविड आणि नॉन कोविड )अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांच्या उपचारासाठी राज्य शासनाने २१ मे २०२० रोजी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. मुंबई नर्सिंग एक्ट २००६ नुसार जिल्ह्यातील नोंदणीकृत एकुण ४६ खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे.शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार खाजगी रुग्णालयात उपलब्ध ८० टक्के खाटांचा वापर कोविड उपचारासाठी केला जाणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय वैद्यकीय संघटना (आय.एम.ए.) ची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलिस अधिक्षक मंगेश शिंदे , सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.विनायक रुखमोडे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक,डॉ.हिंमत मेश्राम,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा प्रशासन अधिकारी विनोद जाधव, गोंदिया,आय.एम.ए शाखा अध्यक्ष डॉ.प्रणिता चिटणविस,सचिव डॉ.चंद्रशेखर राणा,डॉ. राजेन्द्र जैन, डॉ.विनय पांडे, डॉ. जयंती पटले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

या बैठकीत शासनाच्या मार्गदर्शक सूचनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी दिले. जिल्हा शल्य चिकित्सक हे नोडल अधिकारी म्हणुन शासनामार्फत निर्गमीत केलेल्या सूचनेची अंमलबजावणी करतील. जिल्हयातील नोंदणीकृत ४६ खाजगी रुग्णालयात ८० टक्के कार्यरत खाटांची उपलब्धता ठेवणे बंधनकारक राहणार आहे. त्यानुसार खाजगी रुग्णालयांना काम करावे लागणार आहे . जिल्हयात एकुण ११७२ खाटा व ४१ कार्यरत व्हेंटीलेटर उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक मेश्राम यांनी दिली.

कोरोना उपचारासाठी खाटांची कमतरता होऊ नये म्हणुन कोरोना बाधित व कोरोना संसर्ग नसलेल्या (कोविड आणि नॉन कोविड ) दोन्ही प्रकारच्या रुग्णांच्या उपचारासाठी शासनाने ठरवुन दिलेल्या दराप्रमाणे रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहे.

कोविड आणि नॉन कोविड उपचारासाठी ठरावीक दराचे फलक खाजगी रुग्णालयात महत्वाच्या ठिकाणी दर्शनी जागेवर प्रदर्शीत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी या वेळी उपस्थितांना दिले. ते पुढे म्हणाल्या की रुग्णांच्या उपचारासाठी शासन दर प्रमाणे शुल्क आकारले जाईल. तसेच इतर समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक नोंदणीकृत खाजगी रुग्णालयात नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येईल. याबाबत कुठलीही अडचण असल्यास नागरीकांनी संबंधित रुग्णालयातील नोडल अधिकारी यांचेकडे तक्रार नोंदवावी. खाजगी रुग्णालयात नियुक्त करण्यात आलेल्या सर्व नोडल अधिकाऱ्यांकडून प्रत्येक रुग्णालयाची दैनंदिन माहिती गुगल फार्मवर भरुन घेण्याची जबाबदारी आय.एम.ए.चे सचिव डॉ. राणा यांना देण्यात आली.

सदर गुगल फॉर्ममध्ये दैनंदिन स्वरुपात खाटांची माहिती भरली जाईल. प्रत्येक रुग्णालयात किती खाटांची उपलब्धता आहे, याबाबत अचूक माहिती दररोज सकाळी १० वाजता घेण्यात येईल. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याकरिता जिल्हा शल्य चिकित्सक हे वेळो-वेळी जिल्हाधिकारी यांना माहिती सादर करुन समन्वय ठेवण्याचे काम करतील.

जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी यावेळी आय.एम.ए च्या अध्यक्ष डॉ. प्रणीता चिटणवीस, सचिव डॉ. चंद्रशेखर राणा तसेच उपस्थित सर्व सदस्यांना योग्यरित्या सूचनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

कोविड आणि नॉन कोविड उपचारासाठी जिल्हयातील ४६ रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये
१) एक्सीडेंट हॉस्पीटल गणेश नगर,गोंदिया २)जयपुरीया नर्सिग होम, सिव्हील लाईन, गोंदिया, ३)गोंदिया केयर हॉस्पीटल, सिव्हील लाईन, गोंदिया ४) बी.जे. हॉस्पीटल, गणेश नगर गोंदिया, ५) कोलते नर्सिंग होम, गणेश नगर गोंदिया, ६) सेंटर हॉस्पीटल एंड क्रिटीकल केयर , गढ्ढाटोली गोंदिया, ७)के.एम.जे मॅमोरीयल हॉस्पीटल, शास्त्रीवार्ड, आमगाव रोड गोंदिया, ८) पटले नर्सिंग होम रिंगरोड गोंदिया, ९) बालाजी नर्सिंग होम, गणेश नगर, गोंदिया, १० )आशीर्वाद हॉस्पीटल कुडवा नाका, रिंगरोड गोंदिया, ११) अनन्या मेटर्निटी एंड सर्जीकल हॉस्पीटल, सिव्हील लाईन गोंदिया, १२) रॅन्बो हॉस्पीटल, अंगुर बगीचा,वर्धमान कॉलोनी गोंदिया, १३) आध्या क्लीनीक एंड चाईल्ड केयर हॉस्पीटल, रिंगरोड गोंदिया, १४) राणा हॉस्पीटल, शितला माता मंदिर गोंदिया, १५) आय केयर क्लीनीक,रिंग रोड कुडवा नाका गोंदिया, १६) भगत आय एंड ई.एन.टी हॉस्पीटल, राणी अवंतीबाई चौक,रिंगरोड गोंदिया, १७) सत्यम आर्थो हॉस्पीटल, कन्हारटोली,गोंदिया, १८) ओम हॉस्पीटल,पंचबुध्दे कॉम्पलेक्स गोंदिया, १९) कल्पतरु नर्सिंग होम, गणेश नगर गोंदिया २०) अवीन हॉस्पीटल, देशबंधु वार्ड, गोंदिया २१) डॉ.कार्लेकर हॉस्पीटल, मामा चौक गोंदिया, २२) सुर्या नर्सिंग होम, पाल चौक गोंदिया, २३) ब्राम्हणकर हॉस्पीटल, मामा चौक, गोंदिया २४) डॉ. रत्नापारखी नर्सिंग होम, न्यु लक्ष्मी नगर गोंदिया, २५) सहयोग हॉस्पीटल रिंगरोड गोंदिया,२६) मिरावंत हॉस्पीटल,कुडवा नाका गोंदिया, २७) राधे क्रिष्ण हॉस्पीटल, हड्डीटोली, गोंदिया २८) रिलायन्स हॉस्पीटल, गोरेगांव रोड, गोंदिया २९) न्यु गोंदिया हॉस्पीटल, गणेश नगर, गोंदिया ३०) गोंदिया सिटी हॉस्पीटल, गणेश नगर गोंदिया, ३१) ऑस्ट्रीयन ट्रामा सेंटर, फुलचुर गोंदिया, ३२) ईपीऑन हॉस्पीटल, शास्त्रीवार्ड गोंदिया, ३३) गायत्री हॉस्पीटल, गणेश नगर गोंदिया ३४) अग्रसेन हॉस्पीटल,गणेश नगर गोंदिया, ३५) श्री नेत्रालय, रेलटोली, गोंदिया, ३६) गुप्ता नर्सिंग होम, टी.बी हॉस्पीटल रोड गोंदिया, ३७) वैष्णवी नर्सिंग होम, रामनगर गोंदिया, ३८) तुरकर नर्सिंग होम सिव्हील लाईन गोंदिया, ३९) आयुष हॉस्पीटल रेलटोली गोंदिया, ४०) अग्रवाल हॉस्पीटल, गणेश नगर गोंदिया, ४१) श्री नर्सिंग होम, रेलटोली गोंदिया ४२) चौधरी हॉस्पीटल, रेलटोली गोंदिया, ४३) आधार नर्सिंग होम, गणेश नगर गोंदिया ४४) संजीवनी नर्सिंग होम, गोविंदपुर रोड गोंदिया, ४५) डॉ. भुस्कुटे हॉस्पीटल, आमगाव, ४६) शुश्रूषा नर्सिंग होम डॉ. कुदडे, गढ्ढाटोली गोंदिया. या खाजगी रुग्णालयाचा समावेश आहे.अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक गोंदिया यांनी दिली.

blank