38.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

0
439

blank

चंद्रपूर,दि.05ः ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारी असलेल्या बामनगाव येथील राज्यपाल नागोसे (३७) हा शेतकरी शेतात काम करीत असताना वाघाने झडप घालून ठार केले. ही घटना दि. ४ जून दुपारी ५ वा दरम्यान घडली.या परिसरातील
चौथी घटना ठरली.जंगल शेजारी राज्यपाल नागोसे बामणगाव यांचे शेत असून तो नांगरणी करीत असतानाच्या दरम्यान दबा धरून असलेल्या वाघाने झडप घालून ठार केले. या घटनेची माहिती मिळताच मासळ जिल्हा परिषद भाजप क्षेत्र प्रमुख प्रवीण गणोरकर व पस भाजप क्षेत्र प्रमुख गजानन गुळध्ये यांनी धाव घेत घटनास्थळी भेट दिली. तसेच नातेवाईक गावकरी यांनी बघण्यासाठी गर्दी केली असून वृत्त लिहे पर्यत वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले नाही या परिसरातील ही चौथी घटना घडली असून शेतकरी व मजूर वर्गात दहशत निर्माण झालेली आहे.

blank