25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home गुन्हेवार्ता रानडुकरांसह तीन वाघांचा बळी, तीन आरोपी अटकेत

रानडुकरांसह तीन वाघांचा बळी, तीन आरोपी अटकेत

0
139

चंद्रपूर,दि.18 ःःताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोंडेगाव-तारामपेठ वनक्षेत्रात मोहभट्टी चालविण्यासाठी वन्यजीवांवर विषप्रयोग करून रानडुकरासह तीन वाघांचा बळी घेतल्याची खळबळजनक कबुली आरोपींनी ताडोबा व्यवस्थापनाला चौकशी बपयाणात दिली आहे. याप्रकरणी ताडोबा व्यवस्थापनाने तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम कलम 9 अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती ताडोबाचे सहायक वनसंरक्षक बी.सी. येले यांनी दिली.सूर्यभान गोविंदा ठाकरे, श्रावण श्रीराम मडावी, नरेंद्र पुंडलित दडमल असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कोरोना टाळेबंदीत पूर्णतः बंद आहे. अशातच 10 जून रोजी कोंडेगाव-सीतारामपेठ येथील एका तळ्यावर वाघीण मृतावस्थेत आढळली होती. त्यानंतर चार दिवसांनी 14 जून रोजी वाघिणीचे दोन बछडे व रानडुकर मृतावस्थेत आढळले होते.