26.1 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ अति.जिल्हाधिकारी खवलेंकडे जि.प.सीईओंचा प्रभार

अति.जिल्हाधिकारी खवलेंकडे जि.प.सीईओंचा प्रभार

0
1612

गोंदिया,दि.24ः-गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.मंदाता राजा दयानिधी यांची बदली उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी झाल्याने त्यांचा प्रभार गोंदिया येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्याकडे विभागीय आयुक्तांच्या आदेशाने सोपवण्यात आला आहे.दयानिधी यांना मंगळवारला मध्यांनतर कार्यमुक्त करीत जिल्हा परिषदेचा प्रभार अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी स्विकारला असून ते गेल्या काही दिवसापासून गाजत असलेल्या बांधकाम विभागातील प्रकरणाकडे तसेच सेवानिवृत्त अति.मुकाअ यांच्या कार्यप्रणालीकडे लक्ष देतात याकडे लक्ष लागले आहे.