भंडाराः २7 जून — केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने चीन समोर सपशेल शरणागती पत्करली आहे. चीनने २० भारतीय जवानांना हालहाल करुन मारले. तरीही मोदी सरकार गप्पच आहे. दुसरीकडे सारा देश कोरोनाच्या गंभीर संकटाचा सामना करत असताना सातत्याने पेटड्ढोल-डिझेल दरवाढ करुन जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचा उद्योग सुरु आहे. चीनबाबतचे कुचकामी धोरण व अन्यायी इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पक्ष जनसामान्यांसोबत रस्त्यावर उतरुन केंद्र सरकारला जाब विचारीत आहे. मोदी सरकारविरोधात भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटीने नवनियु्नत अध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. आज भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण तालुक्यात ‘शहिदों को सलाम‘ दिवस पाळण्यात आला.
स्थानिक भंडारा शहरातील हुतात्मा स्मारकात काँग्रेसच्या वतीने शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी प्रामुख्याने प्रदेश महासचिव जिया पटेल, माजी आमदार आनंदराव वंजारी, बशीर पटेल, माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, महेंद्र निंबार्ते, प्रेमसागर गणवीर, तालुका अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, शहर अध्यक्ष प्रशांत देशकर आदी उपस्थित होते. मोहन पंचभाई म्हणाले, चीनने सीमेवर आगळीक करून आपले २० जवान मारले. मोदी सरकारने देशाला विश्वासात न घेता माहिती दडवण्याचा प्रयत्न केला. चीनी सैन्याने सीमा ओलांडली नाही, ही फायदा होणारी भूमिका घेऊन मोदींनी देशाचा तसेच आपल्या शहीद जवानांचा अपमान केला आहे.
तीव्र प्रतिक्रिया देतांना मोदींवर शाब्दिक हल्ला केला. केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करत आहे. भारताच्या २० वीरशहीद जवानांप्रती आदरभावना व्यक्त करण्यासाठी ‘शहिदों को सलाम‘ दिवस पाळला जात आहे. विशेष म्हणजे काँग्रेस कार्यकत्र्यांनी कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेने हे आंदोलन केले. तसेच याच दिवशी ऑनलाईन मोहीमही सोशल मीडियावर चालवली गेली, अशी माहिती जिल्हा माध्यम समन्वयक महेंद्र निंबार्ते यांनी दिली.
इंधन दरवाधीविरोधात २९ जूनला राज्यव्यापी आंदोलन
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती अतिशय खालच्या पातळीवर असतानाही मोदी सरकार त्याचा थेट लाभ सामान्य जनतेला होऊ देत नाही. उलट सलग १९ दिवसांपासून पेटड्ढोलडिझेलच्या किमतीत वाढच केली आहे. कोरोनामुळे जगणे मुश्कील झाले असताना ही भाववाढ सामान्य जनतेवर अन्याय करणारी आहे. याच पाश्र्वभूमीवर सोमवारी २९ जूनला केंद्र सरकारच्या विरोधात भंडारा जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी १० ते १२ या वेळत दोन तास धरणे आंदोलन करून इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली जाणार आहे, अशी माहिती नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी दिली. याच दिवशी ऑनलाईन मोहिम सोशल मीडियावर चालवली जाणार आहे.





