25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home शैक्षणिक चिरचाळबांध शाळेत शिक्षक पालक सभा

चिरचाळबांध शाळेत शिक्षक पालक सभा

0
254

आमगाव,दि.30ःतालुक्यातील चिरचाळबांध येथील हरिहरभाई पटेल हायस्कूल व क.महाविद्यालयात चालु शैक्षणिक सञाची पहिली शिक्षक पालक सभा प्राचार्य जि.एम.येळेर यांच्या उपस्थितीत पार पडली.या सभेत शासनाच्या शाळा सुरु करण्याविषयीच्या सुचना,कोरोणा १९ ची सद्याची परिस्थिती,तसेच उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांच्यासोबत झालेल्या सभेतील माहिती पालक व शिक्षकांना देण्यात आली.सभेला शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष लालचंद ठाकुर,क.महा.विभाग शिक्षकपालक संघाचे उपाध्यक्ष संतोष टेंभरे,शिवनीच्या सरपंचा सुजिता भीमटेेे,पर्यवेक्षक ऊल्हास तागडे, चिरचाळबांध सरपंच प्रतिनीधी बळीराम तरोणे,तंटामुक्ती अध्यक्ष भागवत बिसेन,उपसरपंच टेकचंद तुरकर,शिक्षकपालक संघाचे सदस्य सुरेशकुमार टेंभरे,राजु जगणे,मानिकचंद राणे,सौ.सुनीता पारधी,तिलकचंद पटले,संतोष भीमटे,धनराज मौजे,योगेश बिसेन,क.महा.प्रभारी प्रा.आर.आर.बोपचे व ह.भा.प.हाय.व क.महा.विद्यालयाचे सर्व कर्मचारी तसेच इतर पालक ऊपस्थित होते.सभेचे संचालन शिक्षक पालक संघाचे सचिव के.जी.रामटेके यांनी केले तर आभार बन्सीधर शहारे यांनी मानले.