25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home शैक्षणिक निंबध स्पर्धेत आर्णा प्रफुल्ल कचवे महाराष्ट्रात व्दितीय

निंबध स्पर्धेत आर्णा प्रफुल्ल कचवे महाराष्ट्रात व्दितीय

0
337

गोंदिया,दि.30ः-भारतीय डाक विभागाच्यावतीने महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या ‘ढाई अक्षर’ निबंध स्पर्धेत कु.आर्णा प्रफुल्ल कचवे हिने महाराष्ट्रात व्दितीय क्रमांक पटकावला.स्पर्धेत प्रथम क्रमांक महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पटकावला आहे.
भारतीय डाक विभागा द्वारे ‘ढाई अक्षर ‘ निबंध स्पर्धा “प्रिय बापु”या विषयावर आयोजित केली गेली होती.या स्पर्धेत कु.आर्णा प्रफु्ल्ल कचवे हिने महाराष्ट्रातुन व्दितीय क्रमांक मिळविला त्याबद्दल रोख १०,०००रु.पारितोषीक देण्यात आले आहे. आर्णा मनिभाई गुजराती शाळा अमरावतीची विद्यार्थिनी असुन तिने आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापिका अंजली देव,आई अॅड.निकीता कचवे, वडिल शिक्षणाधिकारी असलेले प्रफुल्ल कचवे व आपल्या शिक्षकांना दिले.
तिच्या या यशाबद्दल शिक्षणाधिकारी (प्राथ) राजकुमार हिवारे,उपशिक्षणाधिकारी सुनिल मांढरे,सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी सुधाकर डोये,गटशिक्षणाधिकारी महेन्द्र मोटघरे,प्राचार्य व्हि.डी.मेश्राम,प्राचार्य जि.एम येळे,पर्यवेक्षक ऊल्हास तागडे,स.शि.बन्सीधर शहारे यांनी अभिनंदन केले