आमगाव येथील नवतालावात 33 वर्षीय युवकाचा मृत्यूदेह आढळला

0
724

आमगाव,दि.30ःः येथील कुंभारटोली परिसरातील नवतलावात आज सकाळी एका 33 वर्षीय युवकाच्या मृतदेह पाण्यात तरंगतांनी आढळून आल्याची घटना उघडकीस आली. आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणारा कुंभारटोली कुंभारटोली येथील 33 वर्षीय युवक सत्यकुमार बाबुराव सोनवणे याच्या मृत्यूदेह असल्याचे तपासात समोर आले आहे.सत्यमकुमार हा काल दुपारपासून घरून निघून गेला होता त्यांच्या घरच्या लोकांनी परिसरात शोधा शोध केले. परंतु त्याच्या कुठेही पत्ता लागला नाही पण आज सकाळी नवतलावात आंघोळ करण्याकरिता आलेल्या व्यक्तींनी ही माहिती परिसरातील लोकांना दिली. तिथे मृतकाचे वडील व भाऊ पाहायला आले असता तो मृतदेह सत्यकुमार सोनवणेचाच असल्याचे सांगितले.पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याच्या मृत्यूदेह तलावातून काढून त्याचा पंचनामा करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार दिलीप कन्नमवार करीत आहे.