आयपीएल क्रिकेट सट्टय़ावर धाड, २0 जणांवर गुन्हा दाखल

0
796

गोंदिया–सनरॉईज हैद्रबाद विरूध्द दिली कॅपिटल या आयपीएल टी-२0 क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणार्‍या दोन ठिकाणी धाड घालून गोंदिया शहर पोलिसांनी २0 जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई २९ सप्टेंबरच्या रात्री ८.३0 वाजता केली आहे. गोंदिया शहराच्या कृष्णपुरा वॉर्डातील इरफान उर्फ गट्टू अयुब शेख (३0) यांच्या घरी सट्टा सुरू होता. त्यात गोंदिया शहर पोलिसांनी धाड घालून आठ मोबाई, एक टीव्ही, एक लॅपटॉप, ५ हजार ६00 रुपए रोख व इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणात १ लाख ३९ हजार ३१0 रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात इरफान उर्फ गट्टू अयुब शेख (३0), मोनिष, अकरम, पैष्ठजल, डी.जे. इमरान, रोशन, राजेन, उमेर, बाबा, निखिल, एस.कुमार, सुशील शुभम, नितीन, जॉकी, बंटू, अतिश, एसआरके, सर्व रा. कामठी नागपूर यांच्या विरूध्द महाराष्ट्र जुगारबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.