श्रीगोंद्यात महाराष्ट्र एक्सप्रेस लुटीचा प्रयत्न फसला

0
53

नगर /प्रतिनिधी -नगर जिल्ह्यात नगर दौंड महामार्गावर श्रीगोंदा तालुक्यात नेहमीच रेल्वे गाड्या लुटण्याचे प्रकार मागे घडलेले आहेत. काल रात्री श्रीगोंदा रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर- गोंदिया ही रेल्वे प्रवासी गाडी क्रॉसिंग साठी थांबलेली असताना दहा ते पंधरा जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने रेल्वे डब्यावर दगडफेक केली व हे चोरटे दोन रेल्वे बोगीला लटकले.त्यांनी रेल्वेत चढून प्रवाशांना धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला.

मात्र याची माहिती स्टेशनमास्तर रवींद्र पंडित व रेल्वे सुरक्षा पोलीस कर्मचारी संजय वामन पाचपुते व रेल्वे गार्ड यांना समजली.त्यांनी सतर्कता दाखवल्याने व दरोडेखोरांना प्रतिकार केल्याने आणि प्रवाशांनी ही हिंमत दाखवल्याने या दहा ते पंधरा चोरट्यांना रेल्वे लुटण्यात लुटण्यात यश आले नाही. त्यांना खाली जावे लागले.

श्रीगोंदा पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग केला मात्र ते अंधारात फरार झाले.रेल्वे प्रवाशांनी हा थरारक अनुभव रात्री घेतला.या भागात नेहमीच रेल्वे लूट करणारी टोळी कार्यरत असून रेल्वे पोलीस यंत्रणेने या भागात मोठी सुरक्षा नेहमी कार्यरत ठेवणे आवश्यक आहे.