मोलकरणीला डांबून ठेवणाऱ्या भाजप नेत्या सीमा पात्रांना अटक

0
109

माजी IASच्या पत्नीकडून भयंकर छळ; रॉडने तोडले दात

रांची- 8 वर्षे मोलकरणीचा छळ करणाऱ्या निवृत्त आयएएसच्या पत्नी आणि भाजपच्या निलंबित नेत्या सीमा पात्रा यांच्या पत्नीला रांची पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांना अटक करण्यापूर्वी त्या अटकेच्या भीतीने पळून जाण्याचा प्रयत्न करत होत्या. गेल्या दोन दिवसांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

निवृत्त आयएएस महेश्वर पात्रा यांच्या पत्नीने घरातील कामाच्या बहाण्याने 29 वर्षीय आदिवासी अपंग मुलीला 8 वर्षे घरात डांबून ठेवले. सुनीता असे पीडितेचे नाव आहे. तिला पुरेसे अन्न दिले जात नसल्याचे तिने सांगितले. तिला रॉडने मारहाण करून गरम तव्याने चटके देण्यात आले होते. सध्या तिची कैदेतून सुटका करून रांची RIMS मध्ये दाखल करण्यात आले आहे.

पीडित सुनीता (उजवीकडे) तिला घरी जाण्याचे सांगायची तेव्हा आरोपी सीमा (डावीकडे) तिला रॉडने मारहाण करायची. ही बातमी समोर आल्यानंतर सुनीता यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.
पीडित सुनीता (उजवीकडे) तिला घरी जाण्याचे सांगायची तेव्हा आरोपी सीमा (डावीकडे) तिला रॉडने मारहाण करायची. ही बातमी समोर आल्यानंतर सुनीता यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.

राज्यपाल बैस संतापले

सीमा पात्रा प्रकरणाची दखल घेत राज्यपाल रमेश बैस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत त्यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना पोलिसांनी अद्याप दोषीवर कारवाई का केली नाही, असा सवाल केला आहे.

घरी जायचे म्हटले तर मालक मारायचा

पात्रा दाम्पत्य रांचीच्या व्हीआयपी क्षेत्र अशोक नगरमध्ये राहते. पीडित सुनीताने सांगितले की, ती गुमला येथील रहिवासी आहे. सीमा पात्रा यांना दोन मुले आहेत. मुलीला दिल्लीत नोकरी लागल्यावर ती 10 वर्षांपूर्वी घरच्या कामासाठी दिल्लीला गेली. ती 6 वर्षांपूर्वी रांचीला परत आली. तिचा सुरुवातीपासूनच छळ होत होता. तिला नोकरी सोडायची होती, पण तिला 8 वर्षे घरात डांबून ठेवण्यात आले. तिने घरी जाण्याचे नाव काढले की तिला बेदम मारहाण करण्यात येई. ती आजारी असताना तिच्यावर नीट उपचारही झाले नाहीत.

सीमा पात्राविरुद्ध एससी-एसटी आणि आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीमा पात्राविरुद्ध एससी-एसटी आणि आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पात्रा दाम्पत्याच्या बंदिवासातून अशी केली मुलीने सुटका

एका दिवशी सुनीताने आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती विवेक आनंद बस्के या सरकारी कर्मचाऱ्याला मोबाईलवर मेसेज करून कळवली. माहितीवरून आरगोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर रांची पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकाने सुनीताची सुटका केली.

सीमा ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानाच्या निमंत्रक होत्या

सीमा यांचे पती महेश्वर पात्रा हे राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागात सचिव आणि विकास आयुक्त म्हणून निवृत्त झाले आहेत. सीमा याही भाजपच्या नेत्या होत्या. त्यांना पक्षाने बेटी बचाओ-बेटी पढाओ मोहिमेचे राज्य निमंत्रकही बनवले होते.

डांबून ठेवलेल्या पीडित तरुणीच्या अंगावर जखमेच्या खुणा आढळून आल्या. तो वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त झाल्यानंतर पोलिस तिचा जबाब नोंदवतील. तिच्या सुरक्षेसाठी दोन पोलीसही तैनात करण्यात आले आहेत.
डांबून ठेवलेल्या पीडित तरुणीच्या अंगावर जखमेच्या खुणा आढळून आल्या. तो वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त झाल्यानंतर पोलिस तिचा जबाब नोंदवतील. तिच्या सुरक्षेसाठी दोन पोलीसही तैनात करण्यात आले आहेत.

एससी-एसटी कलमांतर्गत गुन्हा दाखल

सीमा पात्रा यांच्या विरोधात रांचीमधील अरगोरा पोलीस ठाण्यात एससी-एसटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच आयपीसी कलमान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हटियाचे डीएसपी राजा मित्रा यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस पीडितेची वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त होण्याची वाट पाहत आहेत जेणेकरून बयान नोंदवता येईल. सुनीताच्या सुरक्षेसाठी दोन महिला पोलिसही तैनात करण्यात आले आहेत.

सीमा या भाजपच्या 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' शाखेच्या राज्य समन्वयक होत्या. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
सीमा या भाजपच्या ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ शाखेच्या राज्य समन्वयक होत्या. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.