कलपाथरीच्या पाणी टाकीवर 18 दिवस विरुगिरी करणाऱ्या पारधीवर गुन्हा दाखल

0
36

गोरेगांव,दि.14ः- तालुक्यातील कलपाथरी येथे शेताकडे जाणार्‍या रस्त्यावर गैरअर्जदाराने केलेल्या अतिक्रमणामुळे गेल्या अनेक वषार्पासून न्याय मिळावा यासाठी शेतकरी पुरणलाल पारधी हा महसूल प्रशासनाचे पायपीट करीत आहे. कसलाही न्याय मिळत नसल्याने त्याने २५ नोव्हेंबरपासून गावातील पाणी टाकीवर चढून आंदोलनाला सुरवात केली होती.गेल्या १8 दिवसांपासून एक-एक दिवस न्यायासाठी प्रतिक्षा करीत  असतनाच 13 डिसेबंर रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या माध्यमातून तहसिलदार व पोलीस निरिक्षकांच्या उपस्थितीत त्याला पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरवण्यात आले.त्यानंतर मात्र पाण्याच्या टाकीवर चढून आपल्या सार्वजनिक उपद्रव व लोकांचे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करून विरुगिरी केल्याबद्दल आंदोलनकर्ता पारधी याच्यावर गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली.मात्र पारधी ज्या मागणीला घेऊन आंदोलन करीत होता,त्यावर कुठलाच निर्णय न झाल्याने हे आंदोलन त्याच्या अंगलट आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार “कलपाथरी येथील ईसम नामे – पुरणलाल आसाराम पारधी वय 43 वर्षे याने दिनांक 25/11/2022 रोजी ग्राम पंचायत कलपाथरी मालकीचे आखारातील लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या सार्वजनिक पाण्याच्या टाकीवर उंच टोकावर जीव जाण्याचा संभव आहे. याची जाणीव असून सुद्धा त्यावर चढून टाकीवरच 19 दिवसापासून नैसर्गिक विधी करून सार्वजनिक उपद्रव व लोकांचे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होईल असे कृत्य केले.त्यास वैद्यकीय मदत पुरविण्याचा प्रयत्न करीत असताना तसेच महसूल प्रशासन , पोलीस प्रशासन यांनी वारंवार खाली उतरण्याची विनंती करून सुध्दा टाकीवरून उडी मारण्याची धमकी देवून सामान्य जनता, महसूल प्रशासन , पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग यांना त्रास होण्याचे जाणीवपूर्वक उद्देशाने वेठीस धरल्याने महसूल प्रशासन , पोलीस प्रशासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, अग्निशमन दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक यांनी संयुक्त योजना आखून पाण्याच्या टाकीचे भोवताल चारही बाजूंनी जाळ्या लावून प्रशासनाव्दारे विनंती करून 19 दिवसापासून जिल्हा प्रशासनास वेठीस धरणाऱ्या पुरणलाल पारधी या इसमास पाण्याचे टाकीवरून खाली उतरण्याची विनंती करण्यात आली.तो वारंवार खाली उतरण्यास नकार देत असल्याने त्यास पोलीस प्रशासनाने मोठया पोलीस बंदोबस्तात, सार्वजनिक आरोग्य विभाग, अग्निशमन दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे मदतीने अथक परिश्रम करून खाली उतरण्यास भाग पाडले. संपूर्ण जिल्हा प्रशासनास वेठीस धरणाल्यामुळे  पुरणलाल आसाराम पारधी वय 43 रा.कलपाथरी यास ताब्यात घेत सदर प्रकरणी त्याचे विरुद्ध पो. स्टे. गोरेगांव येथे अप. क्र.620/2022 कलम 268, 290, 309 भारतिय दंड संहिता, सहकलम 33 (एम) म. पो. का. अंतर्गत फिर्यादी ग्रामसेवक कलपाथरी यांचे तक्रारी वरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.