मुरदाडा घाटावरुन अवैधरित्या वाळूचे उत्खनन,1 कोटीचा मुद्देमाल जप्त,मात्र वाहनमालक अटकेबाहेर

0
41
file photo

गोंदिया,दि.14ः- गोंदिया जिल्ह्यातील नदीपात्रातून सध्या मोठ्याप्रमाणात अवैधरित्या वाळूचे उत्खनन करुन विक्री करण्यात येत असल्याचे प्रकरण उघडकीस येत आहे.गेल्या आठवड्यातच गोंदिया पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत गोंदियातील सरफराज गोंडीलसह 8 जणांवर गुन्हा दाखल केलेला होता.याप्रकरणातील पुर्ण आरोपींना पकडण्या आधीच पुन्हा दवनीवाडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई करीत वैनगंगा नदीच्या मुरदाडा घाटातून वाळूचे उत्खनन करणाऱ्या 06 जणाविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्यांच्याकडील 2 पोकलैंड मशीन, 1 दहाचाकी टीप्पर,5 ब्रास वाळू सह 01,35,15,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांची धडाकेबाज कारवाई सुरु असताना मात्र चालक व वाहकालाच अटक केली जात आहे.तर मालकांना मात्र अद्यापही अटक करण्यात आले नसल्याचे दिसून आले.
पोलिसांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार पोलीस ठाणे दवानिवाडा हद्दीतील मुरदाडा घाट वैनगंगा नदीच्या पात्रातून काही लोक बेकायदेशीरित्या विना परवाना वाळूचे उत्खनन करून गौण खनिजाची चोरी करीत असल्याची माहिती दवनीवाडा पोलीस ठाण्याला मिळाल्याने 14/12/2022 चे मध्यरात्री 00.30 ते 2.20 वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या निर्देशान्वये व मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा  प्रमोद मडामे यांच्या नेतृत्वातील दवनीवाडा पोलीस पथकाने मुरदाडा घाट वैनगंगा नदीपात्र परिसरात छापा घातला.त्यावेळी टिप्पर क्रमांक एम.एच ३५ ए. एच. 9292 चा चालक राजू मनोहर डहारे वय 37,रा.खुर्शीपार,ता. खैरलांजी, जि. बालाघाट हा अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करून वाळूची चोरी करून वाहतूक करतांना आढळून आला.तसेच वैनगंगा नदीच्या पात्रात पोकलैंड मशीन द्ववारे रेतीचे उत्खनन करतांना पिवळया रंगाची ह्युंडाई रोलेक्स 210-7 पोकलैंड मशीन चालक घनशाम कन्नयालाल डहाके, वय 36, रा.वाकडी, ता.खैरलांजी,जि.बालाघाट,निळसर रंगाची कोबेलोको एस के 210 HDLC कंपनीचे पोकलँड मशीन चालक मनोजकुमार सुमिरन यादव,वय २3 रा.दादरीकला, ता.बहरी,जि.सिधी.मिळून आल्याने पोकलैंड मशीनसह ताब्यात घेण्यात आले.तसेच अवैधरित्या रेती उत्खनन करुन रेती चोरी करुन वाहतूक करतांना टिप्पर क्रमांक एम.एच-३५ ए.एच.9292 टिप्पर,पिवळ्या रंगाची 210-7 कंपनीची *पोकलैंड मशीन व कोबेलको एस के एच. डी. एल. सी. निळसर रंगाची पोकलैंड मशीनच्या मालकाचे नाव मात्र मिळू शकले नसल्याचे म्हटले आहे.जेव्हा की या वाहनांच्या चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असताना त्या चालकांनी ते वाहन कुणाचे हे सांगले नसावे का अशा प्रश्न उपस्थित झालेला आहे.

पोलिसांनी शासनाचा महसूल बुडवून वाळूचे अवैधरित्या उत्खनन करून वाळूची चोरी करून गुन्हा करणार्या आरोपितांविरुद्ध पो. स्टे. दवनिवाडा येथे अप. क्र. 304 /2022 कलाम 379, 109 भारतिय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी यांचे कडून 1,35,15,000/- रुपयांचा अवैध वाळूसाठा व उत्खननाकरिता व वाळू चे वाहतुकी करिता वापरलेली वाहने जप्त केली आहेत. तसेच आरोपी 1 ते 3 यांना अटक करण्यात आलेले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास दवनिवाडा पोलीस करीत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा प्रमोद मडामे यांचे नेतृत्वात ठाणेदार राहुल पाटील, पो. ह. भुरे, पो. ह. बघेले, पो. शि. हर्षे, पो. शि. शेंद्रे यांनी केली आहे.