20 हजाराची खंडणी मागणार्‍या महेंद्र लिल्हारेसह दोघांवर गुन्हा दाखल

0
214

गोंदिया : रावणवाडी पोलीस ठाणेंतर्गत दासगाव येथील अनुसया पशिने हायस्कुल,अर्चना पशिने आर्टस एँड सायंस ज्युनियर काॅलेज येथे 21 फेब्रुवारीला दुपारी जाऊन परीक्षा केंद्रावर काॅपी सुरु आहे अशी चित्रफीत सामायिक करण्याची धमकी देत महिला प्राचार्याला २0 हजार रुपयाची खंडणी मागणार्‍या दोन आरोपींविरोधात रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये महेंद्र लिल्हारे(35,रा.इंगळे चौक,गोंदिया) व दिनेश पटले(36 रा.चिचगाव,ता.गोरेगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांचे नाव आहे. याबाबत असे की, तालुक्यातील दासगाव बु. येथील अनुसया पसीने हायस्कूल तथा अर्चना पसीने कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे परीक्षा केंद्र आहे. सध्या दहावी-बारावीची परीक्षा सुरू आहे. २१ फेब्रुवारी रोजी इंग्रजी विषयाचा पेपर होता. दुपारी दीड वाजताच्या सुमारास आरोपींनी शाळेत जाऊन तिथल्या इमारतीवर चढले व या चित्रफितमध्ये पोलिसांच्या समक्ष काॅपी केली जात असल्याची चित्रफित तयार करुन महिला प्राचार्य यांना भेटून तुमच्या केंद्रावर मोठय़ा प्रमाणात कॉपी प्रकरण सुरू आहे. असे बोलून फिर्यादीला २0 हजार रुपयांची मागणी केली. याप्रकरणी महिला प्राचार्य वंदना परसराम बिसेन(52,रा.दुर्गाभवन,साईमंदीररोड सिव्हील लाईन गोंदिया) यांच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी आरोपींविरोधात 9 मार्च रोजी भांदवीच्या कलम 385,34 अन्वये गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अंबुरे करीत आहेत.

याप्रकरणात शाळेच्यावतीने सरळ पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करण्यात आली होती.त्या तक्रारीमध्ये खंडणी मागणारे कशापध्दतीने वावरत होते याची सविस्तर माहिती देण्यात आली.त्यानंतर याप्रकरणाची आधी सत्यता तपासून घेतल्यानंतर पोलीस अधिक्षकांनी रावणवाडी पोलिसांना याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याच निर्देश दिले होते.या घटनेनंतर अनेक शाळांमधून सुध्दा अशाचप्रकारे त्रास दिला जात असल्याचा सूर येऊ लागला असून पुढे अजून काही प्रकरणे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.