फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

0
18

तुमसर : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे आपत्तीजनक फोटो आणि व्हिडीओ काढले. त्यानंतर ते व्हायरल करण्याची धमकी देत या अल्पवयीन मुलीवर अनेकदा अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.पीडितेच्या पालकांनी ८ मे रोजी तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. भूषण रामलाल आंबेकर (२२) रा. रोहा ,ता. मोहाडी यास या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.पीडित अल्पवयीन मुलीला आरोपी भूषणने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. दोघेही व्हिडीओ कॉलद्वारे संवाद करू लागले. काही दिवसानंतर तो तिला शरीर सुखाची मागणी करू लागला. दरम्यान, त्याने तिचे आपत्तीजनक फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देत पीडितेसोबत अनेकदा विविध ठिकाणी तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी भूषणला अटक केली.