रिसॉर्टमधून ‘न्यूड डान्स’चा पर्दाफाश, १३ मुली, मालकासह ३७ जण ताब्यात

0
14

नागपूर : ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून नागपूर नजिकच्या व कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाचगाव येथील सिल्व्हरी लेक फार्म रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या ‘न्यूड डान्स’चा पर्दाफाश केला. पोलिसांनी १३ नृत्यांगणा, मालक, व्यवस्थापकासह ३७ जणांना ताब्यात घेऊन कुही पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.मालक राजबापू मुथईया दुर्गे रा. नागपूर, व्यवस्थापक विपीन यशवंत आलोणे रा. जगनाडे चौक, नागपूर, नृत्यांगणा पुरविणारा भुपेंद्र ऊर्फ मॉन्टी सुरेश अणे रा. रामटेक तसेच, अभय व्यंकटेश सकांडे,अतुल ज्ञानेश्वर चापले, शुभम ओमप्रकाश पवनीकर रा. जुनी मंगळवारी विशाल माणिकराव वाणी, आशिष नत्थूजी सकांडे, हर्षल भाऊराव माळवे, विजय सदाशिव मेश्राम, प्रवीण महादेवराव पाटील, अशोक तुकाराम चापडे , कौसर अली लियाकत अली सईद, प्रशांत ज्ञानेश्वर घोगडे, प्रवीण रामभाऊ बिडकर, सतीश उध्दवराव वाटकर ,गजानन रामदास घोरे, महेश महादेव मेश्राम, गोविंद जेठालाल जोतवानी, राकेश विठ्ठलराव भांढेकर, अविनाश शंकरराव पंधरा, आकाश किसनाजी पिंपळे, संजय सत्यनारायण राठी सर्व रा.वर्धा व राजेश रमेश शर्मा रा. दयाळनगर अमरावती, अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.

वर्धा व अमरावतीमधील ताब्यात घेण्यात आलेले सर्वजण कृषी सेवा केंद्राचे संचालक आहेत. एका किटकनाशक कंपनीने ७५ हजारांवर माल खरेदी करणाऱ्या केंद्र संचालकासाठी ही पार्टी आयोजित केली. मोंटूने यासाठी नागपूर व रामटेकमधील १३ नृत्यांगणा रिसोर्टवर नेल्या. सोमवारी पहाटे रिसोर्टवर तरुणी अत्यंत तोडक्या कपड्यात अश्लील नृत्य करीत असल्याची माहिती नागपूर ग्रामीणचे अधीक्षक हर्ष पोद्दार यांना मिळाली. अतिरिक्त अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे,सहाय्यक पोलिस निरीक्षक राजीव कर्मलवार, आशिषसिंग ठाकूर ,उपनिरीक्षक आशिष मोरखडे, बट्टूलाल पांडे, चंद्रशेखर गाडेकर, ज्ञानेश्वर राऊत, हेडकॉन्स्टेबल गजेंद्र चौधरी, अरविंद भगत व त्यांच्या सहकाऱ्यांनी रिसोर्टवर छापा टाकला. सर्वांना ताब्यात घेत कुही पोलिसांच्या स्वाधीन केले. रिसोर्टमधून पोलिसांनी सव्वा लाखाची रोख, विदेशी दारूचा साठा, स्पिकर, पाच कारसह ४९ लाखांचे साहित्य जप्त केले.