24.8 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home गुन्हेवार्ता घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

0
93

गोंदियाः तालुक्यातील नवेगाव येथे ६ ऑक्टोबर रोजी अज्ञात चोरट्यांनी तक्रारदार श्रीमती नविन राजेश मोहनकर (४०) यांच्या घरात प्रवेश करून सोने व चांदीचे दागिन्यासह रोख व इतर साहित्य चोरून नेले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून दवनीवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून पोलिसांनी तपासकार्याला सुरूवात केली. दरम्यान प्रकरणाचा उलगडा करीत चोरी प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. कार्तिक दीनदयाळ मोहनकर याला ताब्यात घेवून कसून चौकशी केली असता चोरी केल्याचे कबूल केले. तसेच चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत केला. ही यशस्वी कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
सविस्तर असे की, दवनीवाडा पोलिस ठाण्यातंर्गत येत असलेल्या नवेगाव येथे श्रीमती नवीन राजेश मोहनकर (४०) रा. नवेगाव हे ६ ऑक्टोबर रोजी गावातील सार्वजनिक ठिकाणी शारदा मातेची
आरतीसाठी रात्री ८ वाजता गेले होते. दरम्यान रात्री १० वाजता सुमारास परत आले असता त्यांचे घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात जाऊन पाहणी केली असता अज्ञात चोरट्यानी घरात प्रवेश करून सोने व चांदीचे दागिने, नगदी व इतर साहित्य चोरून नेल्याचे समोर आले. याची तक्रार दवनिवाडा पोलिस स्टेशन करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपासकार्याला सुरूवात केली. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारावर गावातील कार्तिक दीनदयाळ मोहनकर याला ताब्यात घेतले. दरम्यान त्याची कसून चौकशी केली असता त्याने
चोरी केल्याची कबूली दिली. यावरून पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरी केलेला मंगळसुत्र, सोन्याचे झुमके, चांदीचे दोन चैन, पैजण, करदन, आकडा असा एकूण ९८ हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कामगीरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांचे निर्देश सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शनात पोलीस पथक मपोउपनि वनिता सायकर, पोहवा. रियाज शेख, सुबोध बिसेन, इंद्रजित बिसेन, संतोष केदार, घनश्याम कुंभलवार यांनी कारवाई केली.

blank