23.8 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home गुन्हेवार्ता महिला डॉक्टरवर लैगिंक अत्याचार करणारा पोलीस उपनिरिक्षक फरार

महिला डॉक्टरवर लैगिंक अत्याचार करणारा पोलीस उपनिरिक्षक फरार

0
228
सातारा,दि.२४ः जिल्ह्यातील फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या महिला डॉक्टरने पोलीस उपनिरिक्षकावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करत आपलं जीवन संपवल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.महिला आयोगानेही या घटनेची दखल घेतली आहे. दोन महिन्यांपूर्वी खासदारांच्या दोन पीएंचा उल्लेख असणारे पत्र महिला डॉक्टरने पोलिसांना दिले होते. या तक्रारीचे काय झाले, असाही सवाल महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला आहे. दरम्यान संशयित आरोपी बदने व त्याच्या साथीदार बनकर हे दोघेही फरार असल्याचे समोर येत आहे.
साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ महिला डॉक्टरने आपलं जीवन संपवल्याची अत्यंत धक्कादायक घटना रात्री उशिरा उघडकीस आली आहे. या घटनेमुळे फलटण परिसरात तसेच संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपजिल्हा रुग्णालयातील कार्यरत असलेली महिला डॉक्टर काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागाच्या एका वादामध्ये अडकल्या होती. तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीमुळे महिला डॉक्टर मोठ्या मानसिक तणावाखाली होती. त्यानंतर महिला डॉक्टरने टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी हातावरच एक चिठ्ठी लिहिली होती. यात ग्रामीण पोलीस ठाण्याचा पीएसआय गोपाल बदने आणि अन्य एका व्यक्तीचे नाव लिहिले होते. सुरुवातीला हा पोलीसच असल्याचे यात म्हटले होते. परंतू, तो पोलीस नसल्याचे आता प्रशासन सांगत आहे. प्रशांत बनकर याचे त्यात नाव असून त्याने मानसिक आणि शारिरीक त्रास दिल्याचे या डॉक्टरने हातावर लिहिले होते.पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.
blank