शिरपूरमध्ये आयकर पथकाला धक्काबुक्की, महिला अधिकाऱ्याचा विनयभंग

0
7
धुळे,दि.19 – आयकर विभागाची तपासणी मोहीम सुरु असताना शिरपूरमध्ये आयकर विभागाच्या पथकाला धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत पथकातील महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरपूरचे माजी नगराध्यक्ष तथा शिरपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांच्यासह  300 जणांविरोधात शिरपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.