लाचखोर डॉक्‍टरांवर कारवाई

0
9

नागपूर,दि.30 – डोळ्यावर शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाला देण्यात येणाऱ्या इंजेक्‍शनसाठी रुग्णाच्या नातेवाइकाकडून तीन हजार रुपयांची लाच घेताना मेडिकलच्या दोन डॉक्‍टरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. एसीबीने ही कारवाई सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास केली. डॉ. वंदना अय्यर (वय ३५) आणि डॉ. स्वानंद शैलेश प्रधान (वय २६) अशी लाचखोर डॉक्‍टरांची नावे आहेत. या घटनेमुळे मेडिकलमध्ये एकच खळबळ उडाली होती.